आगवे येथे ट्रॅव्हल्सचा अपघात, १४ प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

या अपघातात ट्रॅव्हल्‍समधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. 

सावर्डे (रत्‍नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे नजिकच्या आगवे (ता. चिपळूण) येथे आज (रविवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.

या अपघातात ट्रॅव्हल्‍समधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. 

अपघात झालेली ट्रॅव्हल्स मुंबईकडून मालवणकडे (जि. सिंधुदुर्ग) जात होती. यावेळी जखमींना उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Ratnagiri news accident near savarde