अथर्व कंपनीविरोधात ठेवीदारांचे धरणे आंदोलन

मकरंद पटवर्धन
सोमवार, 11 जून 2018

रत्नागिरी - आर्थिक फसवणूक प्रकरणी रत्नागिरीतील नागरिकांनी अथर्व फोर यू इन्फ्रा अँड अ‍ॅग्रो लि. कंपनीविरोधात लाक्षणिक उपोषण केले. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत आणि व्याजासह परतावा त्वरित मिळावा, अशी  आंदोलकांची मागणी आहे. समविचारी मंचाच्या माध्यमातून आयोजित उपोषणाला दीडशे ठेवीदार सहभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवसभर कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. दुपारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. समविचारी मंचाचे अध्यक्ष बाबा ढोल्ये, युवाध्यक्ष नीलेश आखाडे व जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.

कंपनीची कार्यालये बंद असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. जबाबदार व्यक्ती हात झटकून मोकळे होत आहेत. वित्तीय संस्थेविरोधात कोणत्याही स्थानिक पातळीवर पोलिस तक्रार नोंदवून घेतल्या जात नाहीत. उलट ठेवीदारांना दमदाटी केली जाते. यामुळेच आज सामान्य ठेवीदारांनी एकत्र येऊन आंदोलन केले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या - 

  • ठेवी परताव्यासाठी निश्‍चित मुदत ठरवून द्या
  • गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कंपनीविरोधात गुन्हा दाखल व्हावा
  • कंपनीचा शासकीय लेखापरीक्षण अहवाल जनतेसाठी जाहीर करावा
  • कंपनी अध्यक्ष, संचालक मंडळ फसवणुकीला जबाबदार असल्याने त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हावेत
  •  संचालकांना पासपोर्ट देण्यात येऊ नयेत
Web Title: Ratnagiri News agitation against Atharv company