लोंब्यांमधील दाणे गळून पुन्हा रुजवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

राजापूर - परतीच्या पावसाने कापणीयोग्य भातपीक धोक्‍यात आले आहे. अनेक शेतांमध्ये भातपीक आडवे झाले. भातकापणीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तयार भाताच्या लोंब्यामधील दाणे गळून ते पुन्हा रुजायला लागले आहेत. त्यांना नव्याने कोंब फुटले आहेत. कापणी केलेले भातपीक भिजून नुकसान झाले. शेतकऱ्यांना कापलेले भातपीक वाळवण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे.

भाताच्या लोंब्यांना नव्याने धुमारे फुटलेले असताना शेतामध्ये तयार झालेले भात किडींनी खाऊन फस्त केले आहे. शेतामध्ये भाताचे दाणे पडले आहेत. पाऊस आणि किडीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे  शेतकरी हताशपणे शेतीच्या नुकसानाकडे पाहात आभाळाकडे डोळ लावून आहे. नवरात्रोत्सवानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्याचा फायदा उठवत शेतकऱ्यांनी भातकापणी हाती घेतली होती. दिवसभर भातकापणी आणि रात्री भातझोडणी सुरू आहे.

सकाळी आकाश निरभ्र असल्याने शेतकरी भातकापणी करत होते. मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. कापलेले भातपीकही भिजले. अचानक पावसामुळे कापलेले भातपीक घरी सुरक्षित ठिकाणी नेणे शक्‍य झालेले नाही. काहींनी भिजलेले भातपीक शेताच्या बांधावरच ठेवणे पसंद केले. त्यामुळे भातपीक भिजून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, भिजलेले भातपीक पुन्हा उन्हामध्ये वाळविणे गरजेचे असल्याने दुबार काम करण्याचे कष्ट शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुपारच्यावेळी अचानक येणारा परतीचा पाऊस थांबावा, असा धावा शेतकरी करीत आहेत.

Web Title: ratnagiri news agriculture crops damage due to rains