राहुल गांधींनी नाणारसह जैतापूरलाही यावे - अमजद बोरकर

राजेश कळंबटे
सोमवार, 30 एप्रिल 2018

रत्नागिरी - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाणारला भेट देणार असतील तर त्यांनी जैतापूर दौराही करावा. या प्रकल्पामुळे मच्छीमार उद्‌ध्वस्त होणार आहे, असे निवेदन जैतापूर विरोधी संघर्ष समितीकडून पाठविण्यात आले आहे. ही माहिती समितीचे नेते अमजद बोरकर यांनी दिली. यामुळे रिफायनरी विरोधाचे इंधन जैतापूर प्रकल्पविरोधाला मिळण्याचे संकेत आहेत.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला इरफान कोतवडेकर, अब्दलू सायेकर, मुहीत खादू यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.

बोरकर म्हणाले की, नाणारला भेट देण्याचे आश्‍वासन राहुल गांधींनी दिले. नाणार प्रकल्पामुळे लोकांचे नुकसान होणार आहे. त्या गावापासून 8 किलोमीटरवरील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालाही त्यांनी भेट द्यावी. या प्रकल्पाविरोधात गेली अनेक वर्षे मच्छीमारांनी लढा देत आहेत. न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. दहा वर्षे पर्यावरणीय परवानग्या मिळालेल्या नाहीत.

यावरून प्रशासनाचे दारिद्य्र दिसते. दाभोळ प्रकल्पावेळची आश्‍वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जैतापूर, रिफायनरी जनमताच्या विरोधात उभारले जात आहेत. अणुऊर्जा प्रकल्पामुळे मच्छीमारांसह अनेकजण बाधीत होणार आहेत. आम्ही रिफायनरी विरोधी समितीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

नाणारप्रमाणेच जैतापूर प्रकल्पामुळे परिणाम होणार आहेत. नाटे येथील तबरेज सायेकर या आंदोलकाचा मृत्यू झाल्यावर तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. तेव्हा सायेकर कुटुंबीयांची भेट घ्यावी अशी मागणी राहुल गांधीकडे केली. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे यावेळी तरी या कुटुंबीयांची भेट घेण्याची मागणी निवेदानाद्वारे करणार आहोत.

एकत्रित लढा देणार

नाणार प्रकल्पालाही आमचा विरोध आहे. सर्व प्रकल्पांच्या विरोधातील समित्यांना एकत्र आणूून लढा उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे श्री. बोरकर यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Amajad Borkar press