हिंमत असेल तर लोकसभा लढवा - अनंत गिते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे किंवा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभवाच्या भीतीने माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी घोणसरे (ता. चिपळूण) येथे शिवसेनेच्या मेळाव्यात पाटील, तटकरेंना आव्हान दिले.

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे किंवा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभवाच्या भीतीने माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी घोणसरे (ता. चिपळूण) येथे शिवसेनेच्या मेळाव्यात पाटील, तटकरेंना आव्हान दिले.

यानिमित्त श्री. गिते व पर्यावरणमंत्री रामदास कदम एकाच व्यासपीठावर आले. त्याचा दाखला देत गिते म्हणाले, की आता तर विरोधकांना निवडणूक जिंकणे अजिबात सोपे नाही, हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावीच. 

देशाला हुकुमशाही नको आहे. मोदी देशात दहशतवाद माजवीत आहेत. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी मुद्दामहून त्रास देण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. गणपतीपुळेच्या विकासासाठी मी ७९ कोटीचा प्रस्ताव सादर केला होता. सरकारकडून २० कोटी मंजूर झाले. भाजपकडून जिल्ह्यावर अन्याय होत आहे.  
- रवींद्र वायकर
, पालकमंत्री

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे निर्धार मेळावा झाला. कोकणात गुहागर विधानसभा मतदारसंघातून त्याची सुरवात झाली. केंद्रीय मंत्री गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.

श्री. गीते म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजपबरोबर युती होईल किंवा नाही याचा कार्यकर्त्यांनी विचार करू नये. आपल्याला स्वबळावरच निवडणूक लढवायची आहे, असा निर्णय पक्षप्रमुखांनी जाहीर केला आहे. कोकणाने महाराष्ट्रावर भगवा फडकवा. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा कोकणातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः कोकणात आले होते. भाजपकडून शतप्रतिशतचा नारा दिला जात असेल तर आम्हालाही स्वबळावर निवडणूक लढवून ती जिंकण्याचा अधिकार आहे. कारण आपली ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. 

 

Web Title: Ratnagiri News Anant Gite comment