अंकिता जंगम मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश 

सिद्धेश परशेट्ये
गुरुवार, 8 मार्च 2018

खेड -  अंकित जंगम मृत्यू प्रकरणी आज विधानसभेत विरोध पक्षाच्यानेत्यांनी लक्षवेधी माडंली. त्यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची सीआयडी चाैकशी करण्यात येईल असे सांगितले. तसेच या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल पोलिस निरक्षकांना निलंबित करण्यात यावे असा आदेश ही त्यांनी दिला.  

खेड -  अंकित जंगम मृत्यू प्रकरणी आज विधानसभेत विरोध पक्षाच्यानेत्यांनी लक्षवेधी माडंली. त्यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची सीआयडी चाैकशी करण्यात येईल असे सांगितले. तसेच या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल पोलिस निरक्षकांना निलंबित करण्यात यावे असा आदेश ही त्यांनी दिला.  

रत्नागिरी जिल्ह्यातील अंकिता जंगम या 19 वर्षीय तरुणीचे 28 डिसेंबर रोजी अपहरण करुन बलात्कार केला होता. त्यानंतर तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी तपासकामात पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे.  अंकिता जंगम प्रकरणी विधानसभेत आज लक्षवेधी मांडण्यात आली. आमदार भास्करराव जाधव, आमदार सुनिल प्रभु यांनी शासकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढत या प्रकरणातील पोलिस व संबधित वैद्यकीय अधिकारी यांना निलंबीत करण्याची मागणी केली.

यावेळी विरोधी पक्षातील सर्व आमदारांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजितदादा पवार यांनीही जोरदार आवाज उठवला.
यावर सरकारकडुन अंकिता जंगम मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच खेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक  डॅनियल बेन यांना निलंबीत करत रत्नागिरी पोलिस अधिक्षकांना या प्रकरणावर हलगर्जीपणा दाखवल्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत असल्याचीही माहिती यावेळी केसरकर यांनी दिली.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने या प्रकरणात लढा देत खेड उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा दिवसांचे साखळी उपोषण केले होते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रवक्ते डाॅ विजय जंगम यांनी या प्रकरणात पाठपुरावा करत अंकिता जंगमला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. 

Web Title: Ratnagiri News Ankita Jangam death case issue