राजापूरात भातावर लष्करी अळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

राजापूर - तालुक्‍यात भातपिकावर निळे भुंग्यांसह किडीचा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. भाताच्या लोंब्या लष्करी अळी कातरून टाकत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पावसामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. 

राजापूर - तालुक्‍यात भातपिकावर निळे भुंग्यांसह किडीचा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. भाताच्या लोंब्या लष्करी अळी कातरून टाकत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पावसामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. 

गेले पंधरा दिवस दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे भातकापणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यातच पिकावर लष्करी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. दिवसभर जमिनीमध्ये राहणारी लष्करी अळी रात्री जमिनीतून वर येत भाताच्या लोंब्या कात्रून नुकसान करीत आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये भाताच्या लोंब्याचे तुकडे जमिनीवर पडले आहेत. दोन वर्षापूर्वी तालुक्‍यामध्ये लष्करी अळीचा शेतीवर अशाप्रकारे प्रादुर्भाव झाला होता. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभाग अलर्ट झाला असून त्यांनी सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. तालुक्‍यातील प्रिंदावण, उपळे, जुवाठी, डोंगर, दोनिवडे ताम्हाणे, शिवणे, कोंढेतड, शीळ, ओझर आदी गावांमध्ये किडीचा परिणाम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  

तालुक्‍यामध्ये भातशेतीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा टायझोफॉस ४० टक्के प्रवाही किंवा लॅम्हासायहलोथ्रीन ५ टक्के मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- -दादासाहेब झेंडे, कीडनियंत्रक 

Web Title: ratnagiri news army worm attack on paddy crop