रत्नागिरी विठ्ठल मंदिरात भाविकांचा मेळा

मकरंद पटवर्धन
सोमवार, 23 जुलै 2018

रत्नागिरी - रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा मेळा जमला आहे. विविध भजन मंडळांची भजने सुरू आहेत आणि सारे वातावरण विठ्ठलमय झाले आहे. आज पहाटे प्रथम पूजेचा मान श्री. व सौ. हातखंबकर यांना मिळाला. त्यानंतर आरती झाली व भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली.

शहराच्या मुख्य भागात या मंदिराला ब्रिटीश सरकारकडून 1874 पासून बारा रुपयांची सनद सुरू झाली. ही सनद देवस्थानने जपून ठेवली आहे. शंकरदास गोपाळदास गुजर यांनी हे मंदिर बांधले; तर नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी शके 1820 मध्ये जीर्णोद्धार केला. गेल्या तीनशे वर्षांपासून उत्सवाची परंपरा सुरू आहे. या मंदिराला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे.

भारताचा स्वातंत्र्यलढा या मंदिराने अनुभवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेकांच्या भाषणांनी हे मंदिरही पावन झाले आहे. परटवणे येथील भार्गवराम मंदिरापासून दाजिबा नाचणकर संस्थापित पायी दिंडी सोहळा सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तसेच दिवसभर विविध भजन मंडळांची भजने आयोजित केली आहेत.

Web Title: Ratnagiri News Ashadhi Ekadashi in Ratnagiri