विठुनामाच्या गजरात बाल वारकऱ्यांची दिंडी

महादेव तुरंबेकर
रविवार, 22 जुलै 2018

रत्नागिरी - विठुनामाचा गजर, भगवे झेंडे, सजवलेली पालखी, पांढऱ्या टोप्या, हातात टाळ घेऊन वारकरी वेशभूषेतील मुलांनी शिस्तबद्धरीत्या काढलेल्या दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते, येथील ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुलांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या वारकरी दिंडीचे.

(कै.) ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात वर्षभर विविध सण साजरे केले जातात. मुलांना लहानपणापासून सण-संस्कृती अनुभवता यावी, त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक वर्षातील पहिला उपक्रम आषाढी एकादशीने सुरू झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका आसक्ती भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या मुलांची वारकरी दिंडी काढण्यात आली.

दिंडीत मुलांनी विठू माउलीचा जयघोष केला. त्यानंतर मैदानावर सर्व मुले एकत्र आली. मुलांनी गोल रिंगण करून फेर धरला, मुलींनी फुगडी घालून आनंद लुटला. त्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पावसाने उसंत दिल्याने मुलांचा उत्साह आणखी वाढला होता. दिंडीत आणि कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापिका सौ. भोळे यांच्यासह विक्रांत भाटकर, सर्व शिक्षक, शिक्षिका, सेविका, कर्मचारी आणि पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Ratnagiri News Ashadi wari special

टॅग्स