रत्नागिरीतील रेल्वे अभ्यासक्रम कल्याणला नेण्याचा प्रयत्न

राजेश कळंबटे
बुधवार, 18 एप्रिल 2018

रत्नागिरी- मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील रेल्वे अभ्यासक्रम कल्याणला नेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पालकमंत्री तथा उच्चं व तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांच्या उपकेंद्र भेटीत ही माहिती पुढे आली.

रत्नागिरी- मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील रेल्वे अभ्यासक्रम कल्याणला नेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांच्या उपकेंद्र भेटीत ही माहिती पुढे आली.

विद्यापीठ सिनेट सदस्यांनी उपकेंद्रातील समस्या श्री. वायकर यांच्या पुढे मांडल्या होत्या. त्याचा आढावा घेण्यासाठी वायकर आले होते. यावेळी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी रखडलेल्या रेल्वे अभ्यासक्रमाविषयीची माहिती दिली. हा अभ्यासक्रम सुरु करण्याविषयी रेल्वे बोर्डाबरोबर दोन वर्षांपूर्वी करार झाला होता. त्यानंतर पुढील कार्यवाही पूर्णतः थांबली होती. रेल्वे मंत्रालयाबरोबर झालेल्या करारात मास्टर अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्स सुरु करायचा यावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर कुलगुरू बदलले. या प्रकारात रेल्वे अभ्यासक्रमाची  प्राधिकरणाची मुदत संपली आहे.

रत्नागिरीत या अभ्यासक्रमाला प्रतिसाद मिळणार नाही मात्र कल्याणला सुरु केला तर तिथे प्रवेश चांगला होईल. असा मुद्दा पुढे आला आहे. ही माहिती आजच्या बैठकीत पुढे आली आहे. यावर पालकमंत्री वायकर यांनी सिनेट सदस्यांना बरोबर चर्चा करून निर्णय घ्या, असे आदेश कुलसचिवांना दिले आहेत.  उपकेंद्रातील सुविधांबाबत नाराजी व्यक्त करताना हा गुरांचा कोंडवाडा करण्यापूर्वी सुधारणा करा असे वायकर सांगितले.

उपकेंद्रात संशोधनावर आधारित अभ्यासक्रम सुरु आहेत. खेड लोटे एमआयडीसीतील प्रदूषणावर संशोधन करून तो केंद्र शासनाला सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर नाणारला येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आधारित संशोधन करा, अशा सूचना श्री. वायकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: Ratnagiri News Attempts to take Railway Course to Kalyan