दारू विक्रेत्याच्या घरावर रणरागिणींची धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

रत्नागिरी - कानलकोंड, मानसकोंड व वांद्री (ता. संगमेश्‍वर) या गावांनी दारूबंदीविरोधात जोरदार उठाव करीत प्रशासनाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. बंद न होणारे अड्डे काल (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास ३०० रणरागिणी आणि पुरुषांनी विक्रेत्यांच्या घरावर धडक मारत बंद करण्याचा सज्जड दम भरला. यापुढे दारूविक्री केल्यास गावकरी त्यांची धुलाई करतील, असा इशाराही दिला. 

वांद्री कुणबीवाडी येथील विठ्ठल मंदिरात काल सायंकाळी तिन्ही गावांतील ग्रामस्थांची बैठक झाली. तीन तास दारूधंद्याविषयी चर्चा झाली. महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे, असा पवित्रा घेतला. नवी मुंबईचे माजी नगरसेवक श्री. यादव, चॅरिटी ट्रस्टचे माजी राज्याध्यक्ष शंकर माटे यांचे त्यांना पाठबळ मिळाले. चर्चेनंतर जमावाने रात्री साडेनऊला वांद्री बाजारपेठेतील मद्य विक्रेत्याच्या घराला घेराओ घातला.

कागदोपत्री सर्व प्रकारची ताकीद दिली. आम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आतापासून झाली पाहिजे. अन्यथा उद्रेक झाल्यास त्याला जबाबदार तुम्हीच असाल, असेही महिलांनी ठणकावले.

गावाच्या विकासासाठी दारूबंदीला बिनशर्त पाठिंबा आहे. यापुढे दारूविक्री करणाऱ्या किंवा पिणाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांची धुलाई करू. गावची वाटचाल शांततेतून समृद्धीकडे करण्यासाठी रणरागिणी तयारच आहेत.
- अनिषा नागवेकर,
सरपंच, वांद्री 

तीन गावांनी एकत्र मिळून दारूविक्री बंद करणे कठीण नाही. वेळप्रसंगी दारूधंदे उद्‌ध्वस्त करून गावाला व्यसनमुक्‍त करू.
- कृष्णा कानर,
ग्रामस्थ

Web Title: Ratnagiri News ban on wine drink special