#MarathaKrantiMorcha  रत्नागिरीसह लांजा, राजापुरात कडकडीत बंद 

रत्नागिरी - सकल मराठा मोर्चातर्फे शुक्रवारी रत्नागिरीत बंद दरम्यान शहातून मोठी रॅली काढण्यात आली.
रत्नागिरी - सकल मराठा मोर्चातर्फे शुक्रवारी रत्नागिरीत बंद दरम्यान शहातून मोठी रॅली काढण्यात आली.

रत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. बाजारपेठेतील काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली. बंदला पाठिंबा देत व्यापारी, एसटी महामंडळ, वाहतूूकदार, हॉटेल, टपर्‍या, शाळा आदीनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दुपारपर्यंत संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते.

मारूती मंदिर सर्कल मोर्चेकरांनी ब्लॉक केला. तेथून भव्य मोर्चा शहरातील लक्ष्मीचौकापर्यत नेऊन तिथे विसर्जीत केला. अतिशय शांततेत कोणतेही गालबोट न लागता बंद यशस्वी करण्यात सकल क्रांती मोर्चाला यश आले. 

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र धगधगत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून मराठा समाजाचा संदेश जावा, या उद्देशाने आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड तालुक्यांनी यातून माघार घेतली. सकाळी साडेनऊ पासून रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कलला मराठा मोर्चेकरी गोळा होत होते. कुवारबावपासून मुख्य बाजारपेठेपर्यंत सर्वांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सुमारे साडेतीन हजार मोर्चेकरी जमा झाले. मारूती मंदिर येथे रस्ता रोको करण्यात आला.

माजी खासदार नीलेश राणे यांनीही मोर्चेकर्‍यांबरोबर रस्त्यावर ठाण मांडले. आमदार उदय सामंत यांनीही याला पाठिंबा दिला. एक मराठा...लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा देत दुपारी साडेबारापर्यंत रास्ता रोको करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com