रत्नागिरीच्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस मानवंदना

राजेश कळंबटे
बुधवार, 7 मार्च 2018

रत्नागिरी-  आज रंगपंचमी....कोकणातल्या होळी सणातला रंगपंचमी हा महत्वाचा दिवस....रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलिस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलिस एलएलआर बंदुकीच्या सहाय्याने पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली हि परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत अनुभवायला मिळतेय. पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आज हि कोकणात कायम आहे..

रत्नागिरीतला बारा वाड्यांचा मानकरी श्रीदेव भैरी...पण कोकणात होळी उत्सवाची सांगता होते ती रंगपंचमीच्या सणांने...होळी उत्सवात विविध परंपरा पहायला मिळतात. तशीच पण जरा हटरे परंपरा रंगपंचमीच्या दुपारी रत्नागिरीत पहायला मिळते. हि परंपरा आगळी वेगळीच म्हणावी लागेल.
रंगपंचमी खेळायला भैैरीची पालखी गावात निघते. त्यावेळी निघणाऱ्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस सलामी देतात. चार बंदूक धारी पोलिस मानवंदना देण्य़ाची हि परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे.

आजही हि प्रथा शिमगोत्सवात कायम आहेत. पालखी होळी उभी असलेल्या ठिकाणाहून गावात रंगपंचमी खेळायला निघते त्यावेळी पालखी समोर येवून शसस्त्र पोलिस या पालखीला मानवंदना देतात. अंगावर वर्दी घातलेले हे पोलिस पालखीला मानवंदना देतात. एलएलआर बंदुकीच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते. अगदी जेमतेम एक मिनिटात मानवंदना पुर्ण होते. पण मानवंदना देताना पोलिसांच्या सुद्धा आनंदाला पारावा उरत नाही. पालखी ज्यावेळी गावात रंगपंचमीसाठी निघते त्यावेळी पालखी ज्या ज्या भागातून जाते त्यावेळी रंगपंचमी खेळली जाते. पालखीला सलामी देण्याची हि परंपरा शिमगोत्सवात फक्त कोकणातच पहायला मिळते.

भैरी देवीची पालखी रंगपंचमी खेळायला बाहेर पडते म्हणजेच रंगपचमीला हि मानवंदना देण्याची परंपरा आहे. काही वेळा महिला पोलिस सुद्धा एसएलआरच्या माध्यमातून हि सलामी देतात. पण यावर्षी हि मानवंदना देण्यासाठी खास पोलिसांची नियुक्ती करण्याता आली होती.

Web Title: Ratnagiri News Bhairi Devi Palakhe Sohala