असगोली गावाला डॉ. नातूंनी फसवले - भास्कर जाधव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

गुहागर -  गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबतची पहिली अधिसूचना जाहीर झाली, मात्र अद्याप असगोली गाव वगळल्याचे नोटिफिकेशन निघाले नसून ते निघणारही नाही. डॉ. विनय नातूंचे कर्तृत्व मोठे असून, त्यांनी असगोलीला फसवले आहे. आनंदोत्सवाची मिरवणूक काढून आपले हसे ही करून घेतल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. 

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी गुहागरमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार जाधव गेले दोन दिवस नगरपंचायत दौऱ्यावर आहेत. आमदार जाधव म्हणाले की, नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबत पहिली अधिसूचना जाहीर झाली. यावर हरकती आल्या नाहीत, मात्र त्यानंतर नगरपंचायतीमधून असगोली वगळल्याचा आदेश आलेला नाही. असे असताना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी असगोलीचा विश्वासघात केला. असगोलीला वगळल्याची खोटी माहिती दिली.

विश्वासघात करण्याच्या भाजपच्या संस्कृतीला ग्रामस्थ बळी पडले. २५ ऑक्‍टोबरपर्यंत आदेश शासनाने काढले नाहीत तर असगोली, नगरपंचायतीपासून वेगळे होऊ शकत नाही.’’

Web Title: ratnagiri news Bharskar jadhav comment