भास्कर जाधवांकडेच जिल्ह्याचे नेतृत्व

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

रत्नागिरी - जिल्ह्यातील राष्ट्रवादी वाढविण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नावेळी नेत्यांच्या आदेशामुळे मला गप्प बसावे लागले. त्याचे परिणाम चिपळूण पालिका निवडणुकीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालापर्यंत दिसून आले, अशी व्यथा आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व्यक्‍त केली. त्यावर अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी भविष्यात भास्कररावच जिल्ह्याचे निर्णय घेतील, असे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर दौऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी जाधव बोलत होते. ते म्हणाले की, पक्ष वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत अडथळे आणले गेले. त्याची कल्पना अजितदादांनाही दिली. मला मोकळे सोडा, जिल्ह्यात पक्ष वाढेल सांगूनही दखल घेतली नाही. गेल्या जिल्हा परिषदेत २५ सदस्य निवडून आणले. रत्नागिरीतून फक्त एक तोही मी अट्टहास केलेला उमेदवार निवडून आला. माझे मंत्रिपद जावे म्हणून प्रयत्न करणाऱ्यालाच मंत्रिपद दिले. त्याचीच पुनरावृत्ती चिपळूण पालिका निवडणुकीत झाली. त्यावेळी वरिष्ठांनी थांबण्यास सांगितले. त्यामुळे गुहागर व्यतिरिक्‍त कुठेही लक्ष द्यायचे नाही, असा मी निर्णय घेतला. ज्यांना पाठीशी घातले, त्यांनी पक्ष सोडला. ज्येष्ठांनी त्यावेळी निर्णय घेतले असते, तर ही वेळ आली नसती.

पंधरा वर्षे एकालाच पद दिल्याने स्पर्धा होत नाही. नवे-जुने वादात पक्ष लयास जातो. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या बाबू म्हाप, राजेश सावंतना विरोध न करता निवडून दिले जाते. रत्नागिरीच्या आमदाराने एका रात्रीत प्रवेश केला. त्यांना निवडून दिले, ही पक्षशिस्त. कार्यकर्ते ठाम असतील तर फरक पडत नाही. जाधव यांच्या भूमिकेला तत्काळ तटकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले की, भविष्यात पक्षाच्या नियुक्‍त्यांबद्दलचे निर्णय भास्कररावच घेतील. त्यांनी नियुक्‍त्यांची यादी आमच्याकडे पाठवली तरीही त्याला मी मंजुरी देईन. अजितदादांनीही प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावांना अनुमोदन दिले. आमदार संजय कदम यांनीही याला अनुमोदन दिले.

Web Title: ratnagiri news bhaskar jadhav