शिमगोत्सवात भास्करराव जाधवांनी नाचवली पालखी (व्हिडिआे)

कृष्णकांत साळगांवकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

गुहागर - कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. आज पहाटे गावागावात होम लागले. माजी मंत्री व आमदार भास्करराव जाधव यांच्या तुरंबव गावच्या सहाणेसमोर होम लागल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी नाचविण्यात आली.

गुहागर - कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. आज पहाटे गावागावात होम लागले. माजी मंत्री व आमदार भास्करराव जाधव यांच्या तुरंबव गावच्या सहाणेसमोर होम लागल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी नाचविण्यात आली. दरवर्षी कुठेही असले तरी न चुकता ते या दिवशी कुटुंबासह गावी पोहोचतात आणि पालखी खांद्यावर घेऊन मनसोक्त नाचवतात..!!

तुरंबव हे श्री. जाधव यांचे गाव. चिपळुण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव..शारदा देवी ही या गावची ग्रामदेवता. यामुळे देवीचा कोणताही उत्सव असो तिथे श्री. जाधव  भक्तीभावाने येतात. देवीची सेवा करतात नवरात्रात देवीचा भव्य उत्सव असतो. यावेळीही श्री. जाधव कुटूंबासह येतात. मोठ-मोठे ढोल गळ्यात घालून ग्रामस्थांच्या सोबत देवीच्या प्रांगणात ढोल वाजवतात. यावर्षी होळीमध्ये देवीची पालखी सोहळ्यात मोठ्या उत्साहाने श्री. जाधव यांनी भाग घेतला. विविध प्रकारे पालखी नाचविण्यात श्री. जाधव माहीर आहे.  तल्लीन होऊन पालखी नाचवितात. 

Web Title: Ratnagiri News Bhaskarao Jadhva involve in Konkan Shimgoushav