रत्नागिरीत पक्षी संवर्धनाचा यशस्वी प्रयत्न

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 23 मे 2018

साडवली - जिल्ह्यातील जंगलतोडीमुळे व सध्याच्या महामार्ग रुंदीकरणामुळे प्रचंड वृक्षतोड झाल्याने पक्षी अधिवास संपुष्टात येवु लागला आहे. तरीही पक्षीप्रेमी नागरीक आपआपल्यापरीने पक्षी संवर्धनासाठी योगदान देत आहेत.  रत्नागिरीतील प्रयत्न प्रतिष्ठान मार्फत सचिव राखी साळवी व प्रकल्प प्रमुख शैलेश खरडे हे स्वखर्चाने पक्षांसाठी खाणे व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. हा एक चांगला उपक्रम आहे.

टाकावू प्लास्टीकच्या माध्यमातुन प्रयत्न प्रतिष्ठानने पक्षांसाठी भांडी तयार केली आहेत. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुरु आहे. आजपर्यंत विविध भागात पक्षांसाठी एकुण ३० फीडर बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी पक्षी येवून दाणे खातात पाणी पितात.

पक्षाच्या एकुण १५५ हून अधिक जाती आहेत  माञ सध्या हे प्रमाण फारच कमी झाले आहे. कावळा व कबुतर असेच प्राणी जास्त दिसत आहेत. धनेश, घुबड हे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे पर्यावरणावर याचा परीणाम होवू लागला आहे.
पक्षांचे संवर्धन करण्याच्या हेतूने प्रतिष्ठानतर्फे पक्षीमित्र प्रकल्प राबवला आहे. नागरीकांचा, विविध संस्था, मंडळांचा प्रकल्पाला मदतीचा हात मिळत आहे. राखी साळवी, शैलेश खरडे यासाठी योगदान देत आहेत. नागरीकांनी आपल्या परीसरातील पक्षांसाठी अशी साधी सोपी खाण्यापिण्याची सोय केल्यास पक्षी संवर्धनास हातभार लागेल, असे राखी साळवी यांना सांगितले.

सध्या महामार्ग रुंदीकरणासाठी प्रचंड वृक्षतोड झाली आहे.पक्षांचा अधिवास संपुष्टात आला आहे .आता या पक्षांचे हाल होणार आहेत. या पक्षांसाठी आपण पाणी व खाणे ठेवण्यासाठी मातीची भांडी तयार करणार आहोत.

- राखी साळवी, सचिव, प्रयत्न प्रतिष्ठान

Web Title: Ratnagiri News Bird conservation in Ratnagiri