देवरूखात गुजरात विजयाने भाजपचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

देवरूख - गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळवल्यानंतर  संगमेश्वर-देवरूखमध्ये पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

देवरूख - गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळवल्यानंतर  संगमेश्वर-देवरूखमध्ये पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळपासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. चढाआेढीच्या या खेळात अखेर भाजपने स्पष्ट बहुमत गुजरातमध्ये मिळवल्याची बातमी येताच देवरूखमधील भाजपच्या तालुका कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली पहायला मिळाली.विजयाचा जल्लोष करण्यात आला. देवरुख कार्यालयाबाहेर शिवाजीचाैकासह तालुक्यात तालुक्यात विविध ठिकाणी पेढे वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आगे बढो" "भारतीय जनता पक्षाचा विजय असो."च्या घोषणांनी देवरूख कार्यालय व परिसर दणाणला. 

हा विजयोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे नेतृत्वाचा असल्याची प्रतिक्रिया संगमेश्वर भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपचे संगमेश्वर तालुक्यातील प्रमोद अधटराव, देवरुखचे नगराध्यक्ष निलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभी शेट्ये, महिला आघाडीच्या रश्मी कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Bjp cheer on Gujarat Victory