बदलत्या वातावरणामुळे किनाऱ्यालगत बंपर मासळी 

राजेश शेळके
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - नैसर्गिक आणि भौगोलिक बदलाचा मोठा परिणाम सागरी जिवांवर होऊ लागला आहे. वातावरणातील मळभ दूर झाल्यानंतर अचानक थंडी वाढली. त्यामुळे खोल समुद्रातील मासळी उन्हाच्या किरणाला किनाऱ्यावर येऊ लागली आहे.

रत्नागिरी - नैसर्गिक आणि भौगोलिक बदलाचा मोठा परिणाम सागरी जिवांवर होऊ लागला आहे. वातावरणातील मळभ दूर झाल्यानंतर अचानक थंडी वाढली. त्यामुळे खोल समुद्रातील मासळी उन्हाच्या किरणाला किनाऱ्यावर येऊ लागली आहे. पारपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी हे बदल हेरून आज याचा पुरेपूर फायदा उठवला. आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड किनाऱ्यावर शेकडो स्थानिक मच्छीमारांनी मासेमारी करून बंपर मासळी मिळवली. 

जिल्ह्याचाच नव्हे; तर कोकणाचा मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. नैसर्गिक दुष्टचक्रात हा व्यवसाय अडकला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरवातीचे दोन ते तीन महिने खराब हवामान, समुद्राच्या उधाणामुळे हंगाम लांबला. आता बदलत्या वातावरणानेच मासेमारीची संधी मच्छीमारांना मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच समुद्रात ऑक्‍सिजन विरहित झोन तयार झाला होता. त्यामुळे मासळी किनाऱ्यावर येत होती. आधी रायगड आणि नंतर पूर्णगड आणि हर्णै किनाऱ्यावर मासळी बंपर मिळाली. त्यामुळे हंगामातील वरकमाई किंवा तोट्याची दरी भरण्यास ही फायदेशीर ठरली. 

गेले दोन दिवस वातावरणामध्ये मळभ होते. आंबा कलमांवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. नैसर्गिक आणि भौगोलिक बदलाचा मासेमारीवरही परिणाम दिसू लागला आहे. मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार खोल समुद्रात आणि गरज भसल्यास हद्दीचे उलंघन करून मासेमारी करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या मच्छीमारांच्या नौका हर्णै, रत्नागिरी बंदरात आल्या होत्या. आज तर आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड, या समुद्र किनाऱ्यावर बऱ्याच दिवसनंतर किनाऱ्यालगत शेकडो स्थानिक नौका मच्छीमारी करताना दिसत होत्या. काही तासातच त्यांना बंपर मासळी मारली. 

दोन दिवसांपासून वातावरणाता मोठे बदल दिसत आहेत. मळबी वातावरणामुळे थंडी गायब झाली. काही ठिकाणी पाऊस झाला. आज अचानक पुन्हा थंडी वाढली. वातावरणातील पारा घसरल्यामुळे खोल समुद्रातील मासळी उन्हाच्या किरणाला किनाऱ्यावर आली. त्यामुळे त्याचा फायदा घेत किनाऱ्यावरच बंपर मासळी मिळाली. 

विशान फजलाणी, स्थानिक मच्छीमार 

Web Title: Ratnagiri News Bumper fish in Aareware, Jaygad