रखडलेल्या कामांवर ‘संपर्क अधिकार्‍यां’चा उतारा

राजेश कळंबटे
गुरुवार, 28 जून 2018

रत्नागिरी - निधी असूनही तो खर्ची पडत नसल्याने वारंवार जिल्हा परिषद प्रशासन पदाधिकार्‍यांचे लक्ष्य बनते. त्याची गंभीर दखल घेत या कामांना चालना देण्यासाठी आणि निधी खर्ची पडावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमला आहे. ती जबाबदारी सर्व खातेप्रमुखांकडे सोपविली आहे. त्यांनी दौरे करुन आढावा घेताना कामे मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी आहे; मात्र ती कामे होत नाहीत. जिल्हा परिषद कारभार गतिमान व्हावा यासाठी दोन दिवसांपुर्वी पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक झाली. त्यात जिल्हा नियोजनमधून प्राप्त निधीतील कामे मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. निधी खर्ची न पडल्याने दायित्व वाढ जाते. त्याचा परिणाम अंदाजपत्रकावर होतो. केंद्र, राज्य, जिल्हा नियोजन आणि जि. प. चे स्वतःचे अंदाजपत्रक यातून कोट्यवधी निधी उपलब्ध होतो. परिपूर्ण कागदपत्रे नसल्याने कामे सुरु होत नाहीत. त्याची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडते.

प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी सीईओंनी प्रत्येक तालुक्यावर संपर्क अधिकारी नेमला आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी खेड, रत्नागिरी सामान्य प्रशासन अधिकारी, कृषी अधिकारी राजापूर, संगमेश्‍वर स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी, चिपळूण आरोग्य अधिकारी, मंडणगड लेखाधिकारी, गुहागर महिला व बालकल्याण अधिकारी, दापोली बांधकाम अधिकारी यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात हे अधिकारी तालुके पिंजून काढणार आहेत. कामांचा आढावा घेऊन ती मार्गी लावण्याचे नियोजन करुन देणार आहेत. तसेच भविष्यात इमारती दुरुस्तीच्या प्रस्तावातील कामांची पाहणीही करणार आहेत.

विकासकामांना चालना देण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी तालुक्यांचा आढावा घेत आहेत. त्याचा आढावा सीईओ घेणार आहेत.

- एस. एस. सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

शाळा दुरुस्तीची स्थिती

जिल्ह्यात शाळा दुरुस्तीची 423 कामे मंजूर होती. त्यातील अवघी 52 कामे पूर्ण झाली आहेत. 236 कामांची निविदा प्रकिया पूर्ण झाली आहे. 184 कामे प्रगतीपथावर आहेत.

Web Title: Ratnagiri News CEO decision contact officer for peding work