खड्डे बुजवून रस्ते "मोटरेबल" करणार - चंद्रकांत पाटील

राजेश शेळके
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - खड्डेमुक्त रस्त्यांसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रत्नागिरीसह चार जिल्ह्यांचा दौरा शिल्लक होता. तो आज पूर्ण केला. 57 हजार किमीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात यश आले आहे. भविष्यात रस्ते आणखी सुस्थितीत म्हणजे "मोटरेबल' करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्याला व वाहन चालविण्यास त्रास होणार नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रत्नागिरी - खड्डेमुक्त रस्त्यांसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रत्नागिरीसह चार जिल्ह्यांचा दौरा शिल्लक होता. तो आज पूर्ण केला. 57 हजार किमीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात यश आले आहे. भविष्यात रस्ते आणखी सुस्थितीत म्हणजे "मोटरेबल' करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्याला व वाहन चालविण्यास त्रास होणार नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार, निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, खातेप्रमुख, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""यापूर्वी अर्थसंकल्पात महामार्ग किंवा रस्त्यांसाठी पुरेशा पैशाची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे जे रस्ते केले जात होते. त्याला अपेक्षित दर्जा नव्हता, पावसात ते खराब होत. कमी रुंदीचे आणि वाहनांच्या क्षमतेचा विचार न करता रस्ते केले जात होते. त्यामुळे रस्ते खराब होत होते. म्हणून राज्यातील 36 जिल्ह्यांतील रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे केले. आतापर्यंत 32 जिल्ह्याचे दौरे पूर्ण झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी चार जिल्ह्यांचा दौरा राहिला होता. आज दौरा पूर्ण झाला असून हे जिल्हे खड्डेमुक्त झाले आहेत. रस्त्यांना वेगळा लेअर देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.'' 

ते म्हणाले की, खड्डे भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या टेंडरची पद्धत बदलण्यात आली. 10 किमी अंतर याप्रमाणे खड्डे भरण्याचे टेंडर काढले. त्यामुळे ठेकेदारावर लक्ष ठेवणे शक्‍य झाले. त्याच्याकडून चांगले काम करून घेऊन 2 वर्षाची हमी घेण्यात आली आहे. खड्डे पडले तर पुन्हा त्या ठेकेदाराकडून भरून घेण्यात येणार आणि नवीन खड्डे पडल्यास सर्व्हेक्षण करून निविदा काढून ते भरले जातील. 3 वर्षांमध्ये 5 हजार किमीचे रस्ते चौपदरी करून राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहेत. त्यासाठी 30 हजार कोटी निधीची तरतूद केली आहे. 

पाटीलांच्या दौऱ्यामुळे खड्डे बुजले

रत्नागिरी-संगमेश्‍वर मार्गावर पावसाळ्यात अगणित खड्डे पडले होते. गाड्यांना दीडपट वेळ लागत होता. बावनदीपासून कुरधुंड्यापर्यंतच्या मार्गावरील मोठ-मोठे खड्डे नोव्हेंबर महिन्यापर्यंत बुजविण्याचे काम सुरू होते. यावर्षी गणपतीत चाकरमानी खड्ड्यातूनच आले. या मार्गावर वांद्रीपासून सोनगिरीपर्यंत पुन्हा मोठ-मोठाले खड्डे पडले. त्यामुळे आधीचे काम कसे झाले, हे उघड झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा असल्याने दोन दिवसांत हे खड्डे तातडीने बुजविण्यात आले. 

Web Title: Ratnagiri News Chandrakant Patil Press