बदलते हवामान कलिंगड पिकाला मारक

सिद्धेश परशेट्ये
गुरुवार, 29 मार्च 2018

खेड - बदलते हवामान व नेहमीच बदलणारी बाजारपेठ यामुळे शेतीमध्ये मोठे नुकसान सोसावे लागते. कलिंगड लागवडीलाही याचा फटका बसला आहे. कडक उन्हामुळे कलिंगड फुटली आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कलिंगडचे वेल सुकले आहेत.

खेड - बदलते हवामान व नेहमीच बदलणारी बाजारपेठ यामुळे शेतीमध्ये मोठे नुकसान सोसावे लागते. कलिंगड लागवडीलाही याचा फटका बसला आहे. कडक उन्हामुळे कलिंगड फुटली आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कलिंगडचे वेल सुकले आहेत. मर रोगाचा प्रादुर्भाव आणि कडक उन्हामुळे खराब झालेली कलिंगडे फेकून द्यावी लागत आहेत. चिंचघर-प्रभूवाडी येथील संजय पायरेंनी यावर्षी सुमारे १२ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन दोन ते अडीच लाख रुपये खर्चून कलिंगड लागवड केली.

सहा एकरात त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. परंतु नंतरच्या सहा एकर क्षेत्रात हवामानातील बदलामुळे वेलावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना फटका बसला.

या रोगामुळे कलिंगडाचा वेल शेंड्याकडून सुकत जात असल्यामुळे फळाची वाढ खुंटते. त्यामुळे पायरे यांना सुमारे दोन ते तीन लाखांचा फटका बसणार आहे. संजय यांनी ही शेती आपले काका व दोन मित्रांच्या मदतीने फुलवली आहे. आम्ही शेतकरी दहा-पंधरा एकर क्षेत्रावर उत्पादन घेतो.

आम्हाला हवा तसा नफा मिळत नाही. व्यापाऱ्यांचे दलाल आमच्याकडून हा माल तुटपुंज्या दराने घेतात. पण बाजारपेठेत वाढीव दराने विकतात. मेहनत न करता ते नफा कमावतात. आमचा माल विकण्यास आम्ही तयार आहोत. परंतु नगरपालिका, ग्रामपंचायतींनी बाजाराच्या ठिकाणी फक्त चार-पाच महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाच्या जागा उपलब्ध करून दिल्यास माल विकणे सोपे होईल.
- संजय पायरे,
शेतकरी

रोगांपासून घ्यावयाची काळजी
भुरी रोगात कलिंगडच्या वेलाच्या पानांच्या दोन्ही बाजूला भुरकट, पांढरट अशी बुरशी वाढते. त्यामुळे रोपांची वाढ होत नाही. केवडा रोगात पानांवर पिवळसर, तपकिरी ठिपके पडतात. त्यामुळे पानामधील प्रकाश संश्‍लेषण क्रिया (अन्नप्रक्रिया) मंदावते. परिणामी वेलीची वाढ थांबते. करप्यात पानावर काळसर ठिपके पडतात व पाने करपल्यासारखी दिसतात. त्यामुळे फळाची वाढ थांबते. मर रोगात वेल शेंड्याकडून सुकत जातो. त्यामुळे फळांची वाढ खुंटते. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी बावीस्टीन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्याला पेरणीआधी प्रक्रिया करणे गरजेचे असते. कार्बनडायझीम हे औषध एक ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिक्‍स करून प्रत्येक झाडाच्या बुंध्यात १०० मिली ओतावे. 

Web Title: Ratnagiri News change in environment affects watermelon