छत्रपती शिवरायांचा जीवनपट उलगडला रांगोळीतून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे दर्शन रांगोळीतून घडवण्यात आले आहे. येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात प्रदर्शन सुरू आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे दर्शन रांगोळीतून घडवण्यात आले आहे. येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात प्रदर्शन सुरू आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी सुलतानी राजवटीने त्रासलेल्या महाराष्ट्रातील परिस्थितीचे ध्वनिचित्रफितींच्या साह्याने दर्शन घडवत निवेदनाच्या पार्श्‍वभूमीवर एकेक रांगोळी प्रकाशनमान होते. त्यातून प्रेक्षकांसमोर शिवचरित्र सादर होते. बालशिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज या उभ्यापुर्या पन्नास वर्षांच्या जीवनपटाची रांगोळी चित्रे प्रक्षकांना सुखवतात. २९ ऑक्‍टोबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. रंगयात्रा कलासमूहाने ते आयोजित केले आहे.

रंगयात्रा कलासमूहाचे रंगावली कलाकार विक्रांत मेस्त्री, सुशांत मेस्त्री, रोशन ठीक, संदेश पांचाळ आणि त्यांना मदत करणा-या सदस्यांना गौरविले. 
दिलीप भाटकर यांनी नाविक जीवनावरील रांगोळया काढण्यासंबधी कल्पना मांडली. प्रमुख पाहुणे संजय पतंगे यांनी रोटरी क्‍लबतर्फे अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. प्राचार्य ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी युवकांच्या कलेची आणि विषय निवडून नवा संदेश देण्याच्या कल्पनेची प्रशंसा केली. रांगोळी कलावंत प्रसन्न कांबळी ही उपस्थित होते. 

नगराध्यक्ष पंडीत यांनी कलेचा अर्थाजनासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून नगरपरिषदेतर्फे सहकार्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. संगणकीय सहकार्यातून रांगोळयांची खुलावट आणखी वाढवता येईल का याचाही विचार व्हावा, असे ते म्हणाले.

Web Title: ratnagiri news Chhatrapati Shivaji Rangoli