सूडापोटी अल्पवयीन मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

खेड - तालुक्‍यातील खवटी-धनगरवाडी येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून  झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. न्यायालयाने त्या चौघांना २७ पर्यंत पोलिस कोठडी दिली.

खेड - तालुक्‍यातील खवटी-धनगरवाडी येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून  झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. न्यायालयाने त्या चौघांना २७ पर्यंत पोलिस कोठडी दिली.

प्रवीण बाबू झोरे (वय १५) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. कुटुंबीयांसह मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्य असलेला प्रवीण बाबू झोरे मूळ गावी आला असता संशयास्पदरीत्या २६ मे रोजी बेपत्ता झाला. हाती लागलेल्या माहितीनुसार नाट्यमयरीत्या शुक्रवारी (ता. २२) पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन खाक्‍या दाखवला. त्यांनी प्रवीणचा खून करून मृतदेह कशेडी घाटात टाकल्याची कबुली दिली.

बाबू झोरे व त्याच्या नात्यातील घाटकोपर येथील जुनी रमाई कॉलनीत राहणाऱ्या मंडळींचे पैशाच्या वादातून डिसेंबर २०१७ मध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक गंभीर यांनी रमेश धोंडू झोरे (वय ३०), विलास महादेव झोरे (१९), संदीप चंद्रकांत ढेबे (२६) व नीलेश अनंत आखाडे (१९) यांना ताब्यात घेतले. चौघांनी प्रवीणला २६ मे रोजी घरातून बाहेर बोलावून घेतले व त्याचा खवटी गावाजवळच्या आंब्याचा माळ परिसरात गळा दाबून खून केला.

पोलिस मृतदेहापर्यंत पोहोचतील या भीतीने प्रवीणचा मृतदेह पिशवीत भरून कशेडी घाटातील काळकाई मंदिर परिसरातील जंगलात टाकला. प्रवीणच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, सहायक निरीक्षक चंद्रकांत लाड, उपनिरीक्षक समद बेग, श्री. धोंडे, सहायक उपनिरीक्षक आनंदराव पवार, पारकर, गायकवाड, कॉन्स्टेबल पवार, विनय पाटील आदींच्या पथकाने तपास केला.

डिसेंबरमध्ये या दोन्ही कुटुंबाची पैशाच्या वादातून जोरदार भांडणे झाली. या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचा खून केला.
- अनिल गंभीर, 

खेड पोलिस निरीक्षक

Web Title: Ratnagiri News child murder