बाळ मानेंचे नाव पुढे हा इच्छुकांना ब्रेक

संदेश सप्रे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

संगमेश्‍वर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघातून भाजपतर्फे बाळ मानेंचे नाव जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदार संघात गेले काही महिने गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणाऱ्या इच्छुकांच्या फुग्यातील हवाच गेल्याची चर्चा संगमेश्‍वर तालुक्‍यात सुरू आहे.

संगमेश्‍वर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघातून भाजपतर्फे बाळ मानेंचे नाव जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदार संघात गेले काही महिने गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणाऱ्या इच्छुकांच्या फुग्यातील हवाच गेल्याची चर्चा संगमेश्‍वर तालुक्‍यात सुरू आहे. मानेंचे नाव इच्छुकांच्या गाड्यांना ब्रेक लावण्यासाठी तर पुढे करण्यात आले नाही ना, अशी चर्चा भाजपअंतर्गत सुरू आहे. 

चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघाशी काहीही संबंध नसलेले काही इच्छुक आपणच भाजपचे उमेदवार असल्याची ग्वाही देत आहेत. विशिष्ट समाजातील लोकांना एकत्र करून आपल्यापाठी समाज किती ठामपणे आहे हे दाखविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत चिपळूण - संगमेश्‍वर तालुक्‍यातील राजकीय वातावरण बदलले आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादीच्या बरोबरीने भाजपची ताकद निर्माण झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या दृष्टीने एकमेव आशेचा किरण म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतः मतदारसंघात ठाण मांडून आहेत. सेनेकडून न होणारी कामे भाजपकडून मार्गी लावली जात आहेत. पक्षाकडून मानेंनाच कामाला लागा, असे आदेश आले. यामुळे दर आठवड्यात मानेंची चिपळूण तालुक्‍यात हजेरी तर संगमेश्‍वर तालुक्‍यात दौरे सुरूच आहेत. मानेंचे नाव पुढे करून इच्छुकांच्या फुग्याला टाचणी लावल्याची चर्चा सुरू आहे. 

प्रदेश भाजपच्या आदेशाने आगामी निवडणुकीसाठी पक्षबांधणीच्या दृष्टीने जिल्हाभरात सक्रिय आहोत. निवडणुकीला अवकाश आहे. पक्ष जो आदेश देईल तो आम्ही मान्य करणार आहोत. निवडणुकीआधी संघटना बांधणीचे काम महत्त्वाचे आहे.
- बाळ माने,
जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: Ratnagiri News Chiplun - Sangmeshwar Politics special