मंडणगडचा रांगडा किल्ला तरुणांकडून झाला चकाचक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मंडणगड - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाभ्रमण योजनेत अधिकृत असलेल्या पर्यटकांसाठीच्या आस्थापनेमार्फत २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्या अनुषंगाने कोंजर येथील ब्ल्यू ग्रीन एक्‍झॉटिकाने ऐतिहासिक मंडणगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत तालुक्‍यातील तायक्वांडो आणि महाविद्यालयीन तरुणाई सरसावली होती. किल्ल्यासह त्यांनी परिसराची साफसफाई केली. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जागतिक पर्यटक दिन केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे साजरा करण्याची संकल्पना राबवत आहे. यानुसार महामंडळाशी संलग्न असलेल्या संस्था, हॉटेल यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानानुसार पर्यटन स्थळे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी १६ ते ३० सप्टेंबर या पंधरवड्यात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

मंडणगड तालुक्‍यातील कोंझर येथील प्रसिद्ध ’ब्ल्यू ग्रीन एक्‍झॉटिका’च्या वतीने  रविवारी (ता. २४) सकाळी ८ वाजता किल्ले मंडणगड स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. किल्ल्यावरील गणपती मंदिर, तलाव, मुख्य रस्ता आणि निसर्ग सौन्दर्य न्याहळता येणाऱ्या जागा आदी परिसर स्वच्छ करण्यात आला. अवधूत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुर्वे, विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, विनोद जाधव, दिनेश झोरे, विनय चव्हाण, अमोल दळवी, प्रतीक पोतनीस, पराग लेंडे यांच्यासह अनेक तरुणांनी सहभाग घेतला.

Web Title: ratnagiri news Cleanliness campaign on mandangad