श्री सदस्यांचे शेकडो हात चिपळूण स्वच्छतेसाठी सरसावले

मुझफ्फर खान
रविवार, 13 मे 2018

चिपळूण - कचरा, कागद, प्लास्टिकच्या पिशव्या व झाडी झुडपांनी बंद झालेला गुहागर नाका येथील नाला रविवारी तासाभरात स्वच्छ झाला. जेष्ठ निरूपणकार, स्वच्छता दूत, पद्मश्री दत्तात्रय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात महास्वच्छता अभिमान राबविण्यात आले. या कामासाठी शेकडो श्री सदस्य सरसावले.

पालिकेच्या हद्दीतील मुख्य रस्ते. महामार्ग परिसर, बाजारपेठ, भाजीमंडई, जुनास्टँड, गुहागर नाका, मच्छिमार्केट, प्रांतकार्यालय, तहसिल कार्यालय,कोर्ट,  पोलीस ठाणे, बस स्टँड आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. चिपळूण शहरातून 30  टन सुका कचरा , 18 टन ओला कचरा उचलण्यात आला. गुहागरनाका येथील नाल्यातून 10 टन गाळ उपसण्यात आला. त्यानंतर या नाल्याने मोकळा श्‍वास घेतला. 

श्री सदस्यांचा हिरिरीने सहभाग

शहर स्वच्छता अभियानात तुरळ, माखजन, कापसाळ, रामपूर, लवेल, अलोरे, सती, आगवे , मालघर आणि चिपळूण येथील श्री सदस्यांनी सहभाग घेतला. शहरातील दुतर्फा रस्त्यांची सफाई करण्यात आली. 

हजारो हात गुंतले स्वच्छतेत

रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या अभियानामध्ये हजारो श्री सदस्यांचे हात स्वच्छतेच्या कामात गुंतले.  स्वच्छतेवेळी ओल्या व सुक्या कचर्‍याचे मूल्यमापन करण्यात आले. जमा झालेला कचरा व्यवस्थेनुसार पोहोचवण्यात आला. कचरा वाहतूकीसाठी श्री. सदस्यांनी आपली वाहने आणली होती. 

पालिकेची उदासिनता

स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक, पालिका व शासकीय कार्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. पालिकेने तीन वाहने उपलब्ध करून दिली. आरोग्य निरिक्षक अशोक साठे वगळता पालिकेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी या अभियानाकडे पाठ फिरवली.

Web Title: Ratnagiri News cleanness movement In Chiplun