मांडवीत किनारा स्वच्छता मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद

राजेश कळंबटे
रविवार, 15 एप्रिल 2018

रत्नागिरी- मांडवी पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  येथे आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवीतील नागरिक, सकाळ माध्यम समूह, रत्नागिरी नगरपरिषद, मांडवी पर्यटन संस्था, मेरिटाईम बोर्ड, स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने मांडवी परिसर आणि किनारा स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी- मांडवी पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  येथे आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवीतील नागरिक, सकाळ माध्यम समूह, रत्नागिरी नगरपरिषद, मांडवी पर्यटन संस्था, मेरिटाईम बोर्ड, स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने मांडवी परिसर आणि किनारा स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

सकाळी सात वाजता रत्नागिरी पालिकेच्या स्वच्छता सभापती दिशा साळवी यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. मांडवी आठवडा बाजार, मांडवी नाका येथून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रत्येकजण हातात खराटा घेऊन स्वच्छता करायच्या उद्धेशाने घराबाहेर पडले होते. 

रत्नागिरी हे सुंदर शहर आहे. ते स्वच्छ करणे व स्वच्छ ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत मांडवी पर्यटन महोत्सव आयोजित होत आहे. यासाठी येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सकाळ माध्यम समूह, रत्नागिरी नगरपरिषद, मांडवी पर्यटन संस्था, मेरिटाईम बोर्ड, स्वराज्य मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मांडवी किनारा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 
- राजीव कीर,
अध्यक्ष, मांडवी पर्यटन संस्था. 

बाळू साळवी, नगरसेवक बंटी कीर, नितीन तळेकर, नगरसेविका साै. दया चवंडे आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. फावड, कचरा उचलायला पिशव्या, हातात हॅन्डग्लोज घालून मांडवीकर सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत लोकांचा सहभाग होता. तीन ते साडेतीन तास चाललेल्या या मोहिमेमुळे मांडवी परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेत अल्ट्रा टेक सह नगरपालिकेचेही सहकार्य होते.

29 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या मांडवी पर्यटन महोत्सवाला परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत येतात. त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना मांडवीत आल्यानंतर स्वच्छता पाहायला मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे श्री.राजीव कीर यांनी सांगितले. 

Web Title: Ratnagiri News Cleanness movement in Mandavi