देवरुख महाविद्यालयात भरडधान्य संवर्धन पाककृती स्पर्धा

प्रमोद हर्डीकर
सोमवार, 29 जानेवारी 2018

साडवली - देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय व सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांनी देवरुख महाविद्यालयात भरडधान्य संवर्धन पाककृती स्पर्धा घेतल्या.

साडवली - देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय व सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांनी देवरुख महाविद्यालयात भरडधान्य संवर्धन पाककृती स्पर्धा घेतल्या.

नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राळा, कुटकी ही भरडधान्ये म्हणून ओळखली जातात. या भरडधान्यापासून शालेय गटातील मुलींनी, महाविद्यालयीन मुलींनी बचतगटातील महिलांनी विविध पाककृती तयार केल्या होत्या. या पाककृतीतून तीन क्रमांकांना गौरवण्यात आले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर हे उपस्थित होते. विविध स्टाॅलवरील भाकरी, चटणी, लाडू, पराठे, आंबोळी, नाचणी सत्व यासारखे पौष्टीक तत्व असलेले पदार्थ उपस्थितांना चाखायला मिळाले.

आठल्ये सप्रे पित्रेचे तसेच सृष्टीज्ञानचे डाॅ. रणजित बनसोडे, डाॅ. प्रताप नाईकवाडे, डाॅ. मीरा काळे, प्रशांत शिंदे, संगीता खरात, ज्योती खोपकर, सुमित पवार आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय हवामानाचा व शेतीचा अभ्यास करण्यासाठी स्विडनच्या संशोधिका श्रीमती झेल्डा, श्रीमती टोव्हा यांची उपस्थिती होती.

Web Title: Ratnagiri News Coarse Grain conservation Recipes Competition