राजापूरच्या स्वच्छतेला विद्यार्थ्यांचा हातभार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

राजापूर - शाळा सुरू झाल्यानंतर नेहमी अभ्यासासह पाठ्यपुस्तकामध्ये गुंतलेले मन आणि शिक्षकांनी दिलेला अभ्यास वहीत उतरविण्यात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातांनी आज शहरामध्ये स्वच्छता करीत राजापूर शहर आणि सुंदर ठेवण्याचे कृतीद्वारे आवाहन केले.

राजापूर - शाळा सुरू झाल्यानंतर नेहमी अभ्यासासह पाठ्यपुस्तकामध्ये गुंतलेले मन आणि शिक्षकांनी दिलेला अभ्यास वहीत उतरविण्यात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातांनी आज शहरामध्ये स्वच्छता करीत राजापूर शहर आणि सुंदर ठेवण्याचे कृतीद्वारे आवाहन केले. ग्रामीण रुग्णालय आणि जवाहरचौक परिसरातील रस्त्यांची साफसफाई करून राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.  

शहराच्या स्वच्छतेच्यादृष्टीने महत्वाकांक्षी असलेले अभियान नगराध्यक्ष हनिफ काझी, उपनगराध्यक्ष जमीर खलिफे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी नयन ससाणे, मुख्य लिपीक किशोर जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये प्रभावीपणे राबविले जात आहे.

अभियानात आता शहरातील राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी आज सहभागी झाले. त्यांच्यासोबत संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. बी. डी. पाध्ये, अध्यक्ष डॉ. छाया जोशी, उपाध्यक्ष अभय मेळेकर, सचिव सतीश रहाटे, सदस्य अनंत रानडे, दिनेश परांजपे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जोशी, पर्यवेक्षिका सौ. पवार, श्री. चव्हाण, रवींद्र घोसाळे, श्री. कुंभार, नगराध्यक्ष हनिफ काझी, मुख्याधिकारी नयन ससाणे, नगरसेवक सौरभ खडपे, मुख्यलिपीक किशोर जाधव, आरोग्य विभागाच्या श्रीमती परब, पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामीण रुग्णालय ते जवाहरचौक रस्त्यासह परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.   

हायस्कूलमध्येही होते स्वच्छतास्वच्छतेसह सामाजिक बांधिलकीची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून राजापूर हायस्कूलतर्फे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दर शनिवारी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या वर्गाची स्वच्छता करतात. तसेच शाळा परिसर आणि क्रीडांगणाचीही स्वच्छता करतात. विद्यार्थ्यांच्या या आदर्शवत उपक्रमाचेही पालकांकडून कौतुक केले जात आहे.  

Web Title: Ratnagiri News Contributions of students to Rajapur cleanliness