‘कृष्णा’च्या तिघा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

चिपळूण - गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा केमिकल, कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीच्या मालक, व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी या तिघांवर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चिपळूण - गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा केमिकल, कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीच्या मालक, व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी या तिघांवर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा केमिकल कंपनीचे गोदाम आणि कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीच्या नवीन प्लॅंटला आग लागली. ज्वालाग्राही पदार्थ लोकवस्तीत साठवताना त्याची योग्य काळजी घेतली नाही, म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

मालक अशोक गुप्ता, व्यवस्थापक अशोक पाटील आणि सुरक्षा अधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे. गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा केमिकल कंपनीचे गोदाम आणि कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीचा नवीन प्लॅंटला २ मार्चला खाक झाला. यामध्ये कंपनीचे सुमारे २६ कोटींचे नुकसान झाले. कृष्णा केमिकल कंपनीच्या गोदामात २०१४ पासून नव्या प्रकल्पाची उभारणी सुरू होती. हे गोदाम लोकवस्तीपासून २०० मीटर जवळ आहे. नागरिकांना अंधारात ठेवून भिंतीच्या पलीकडे प्रकल्पाचे काम सुरू होते.

कृष्णा केमिकलचे गोदाम आणि नवीन प्रकल्प ग्रीन बेल्टमध्ये आहे. या प्रकल्पाला लागलेली आग विझविण्यासाठी जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा बोलविली. आग विझल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये कंपनीतील सुरक्षात्मक उपाययोजनांमधील त्रुटी समोर आल्या. लोकवस्तीपासून २०० मीटर अंतरावर प्रकल्पाची उभारणी करता असताना कंपनीने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना केल्या नव्हत्या, हे पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कंपनीचे मालक अशोक गुप्ता, व्यवस्थापक अशोक पाटील आणि सुरक्षा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.

Web Title: Ratnagiri News Crime against Krishna