पाच लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

रत्नागिरी - बिबट्याचे कातडे खरेदी करण्याच्या आमिषाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिबट्याच्या कातड्याची तस्करी रोखली. बारदानात गुंडाळलेले सुमारे 5 लाखांचे कातडे विक्रीसाठी पाटण (ता. सातारा) येथून आले होते. या प्रकरणी एका संशयिताला जेरबंद केले. काल सायंकाळी पाचच्या सुमारास कुंभार्ली घाटात ही कारवाई केली. तसेच सात लाखांची मोटार जप्त केली. या मागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत. 

दीपक हनमंत पावसकर (वय 41, रा. पद्मावती-धनकवडी, पुणे, मूळ सनबूर, पाटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा येथून एक जण वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन कुंभार्ली घाटात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. कातड्याची ही तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेने संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. ते कातडे विकत घेणारेच ग्राहक म्हणून पोलिस पुढे आले. पाटणहून हे कातडे येणार होते. त्यामुळे पोलिस पथकाने कुंभार्ली घाटात सापळा लावला. प्रत्येक वाहनांची त्यांनी तपासणी केली. पाटणहून आलेल्या गाडीला (क्र. एमएच 12-एनएक्‍स-0112) अडवले. गाडीची तपासणी केली असता डिकीत वाघाचे कातडे बारदानामध्ये गुंडाळलेले आढळले. चालक दीपक पावसकर याच्याकडे या कातड्याबाबत चौकशी केली; परंतु त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्याकडून 5 लाख किमतीचे एका बिबट्याचे कातडे, 7 लाखाची गाडी जप्त केली.

Web Title: ratnagiri news crime leopard's skin is seized