ओमकार पतसंस्थेवर बनावट कर्ज प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

संदेश सप्रे
सोमवार, 25 जून 2018

देवरुख - शहरातील ओमकार पतसंस्थेवर काल बनावट कर्ज प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था ओमकारच्या संचालक मंडळाची झाली आहे.

पतसंस्थेत असलेल्या ठेवीवर बनावट कर्ज काढून ६ लाख ५० हजार परस्पर हडप केले. या प्रकरणात साहाय्यक व्यवस्थापिका सौ मनाली मांगले (देवरुख) यांनी आपली बनावट स्वाक्षरी मारली असल्याची तक्रार विजय मुरलीधर ढोल्ये यांनी देवरुख पोलिस ठाण्यात केली. यावरून देवरुख पोलिसांनी सौ मांगले आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी पत्रकारांना दिली.

हा प्रकार काल संध्याकाळी उघडकीस येताच पुन्हा शहरात ओमकारच्या घोळाविषयी चर्चा सुरु झाली आहे. आधीच अडिच कोटिच्या घोटाळ्या प्रकरणी ओमकारचे संचालक मंडळ अडचणीत आहेत. तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम यांच्या विरोधात संचालक मंडळाने या आधीच तक्रार दाखल केली आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणी संचालक मंडळाचीही चौकशी करण्यात आली होती. आता ढोल्ये यांनी सहाय्यक व्यवस्थापिकेविरोधात तक्रार दाखल केल्याने पुन्हा संचालक मंडळ अडचणीत येणार आहे. ढोल्ये यांची फिर्याद २०१५ साली घडलेल्या प्रकाराबद्दल आहे.  

एक नजर .....

  • सर्वात पहिला घोटाळा २ कोटी ६० लाखांचा 
  • ठेवींवर बनावट कर्ज काढून  रक्कम गायब 
  • नियमित कर्जातही झोलझाल.
  • ठेवीदारांच्या ठेवी अद्यापही अडकून
  • तालुक्यातील नंबर १ संस्था  रसातळाला 
  • आणखी तक्रारदार पुढे येण्याची शक्यता
Web Title: Ratnagiri News crime on Omkar pat sanstha