दापोलीत काँग्रेसला हवे सक्षम नेतृत्व 

चंद्रशेखर जाेशी
सोमवार, 4 जून 2018

दाभोळ - रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे. जिल्हाध्यक्षपदी तीन वर्षांनी माजी आमदार रमेश कदम यांची नियुक्ती झाली. एकेकाळी दापोली तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्यातच दापोलीला अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी तालुकाध्यक्ष मिळालेला नाही.

दापोलीत काँग्रेसला सक्षम नेतृत्व नसल्याने काहींनी राष्ट्रवादीची वाट धरली. काही भाजप आणि सेनेत दाखल झाले आहेत. तरीही दापोलीत काही पारंपरिक व निष्ठावंत मतदार काँग्रेससोबत होते. दापोली नगरपंचायतीत आमदार भाई जगताप यांनी सेनेशी हातमिळवणी केल्याने निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला. त्यामुळे काँग्रेस पिछाडीवर गेली.  

दापोली तालुका काँग्रेसला अध्यक्ष नसल्यामुळे कार्यकर्ते भरकटले आहेत. तालुकाध्यक्ष मिळावा यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अनेक शिष्टमंडळांनी भेट घेऊन मागणी केली होती मात्र अद्यापही तालुकाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या काँग्रेसला चांगले दिवस येऊ लागले असून नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी दापोलीला तालुकाध्यक्ष मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.’ 

-  डॉ. वसंत मेहेंदळे, काँग्रेस पदाधिकारी, दापोली 

दापोली काँग्रेस सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसला नगरपंचायत निवडणुकीत चार जागा मिळाल्या. मात्र नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेशी ‘प्रासंगिक करार‘ केल्याने राष्ट्रवादीने पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी टाळली .काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र राष्ट्रवादीने पंचायत समितीवर सत्ता मिळविली व जिल्हा परिषदेवर तीन उमेदवार निवडून आणले. 

तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष मजबूत होता. आता ग्रामीण भागावरील काँग्रेसची पकड सैल झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातून काँग्रेस हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची गरज असून पक्ष पुन्हा मोठ्या जोमाने वाढवण्यासाठी पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधणे गरजेचे असून दापोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांना वालीच नसल्याची भावना व्यक्त होत असून आता नवीन जिल्हाध्यक्षांनी दापोली तालुका काँग्रेसला तालुकाध्यक्ष मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.  

Web Title: Ratnagiri News Dapoli Taluka Vartaparta