प्रभू, गीतेंचाही कोकण विद्यापीठाचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

रत्नागिरी - रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठाची गरज आहे. तसा आग्रह केंद्रीय व्यापार, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू तसेच अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आहे. 

कोकण विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी विद्यापीठाच्या प्रश्‍नासंदर्भात उभय मंत्र्यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. सुरेश प्रभू व अनंत गीते यांनी कोकण विद्यापीठाच्या प्रश्‍नात सक्रिय लक्ष घातल्याने विद्यापीठाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, असे पाटणे यांनी सांगितले. 

कोकणातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक, प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना विद्यापीठाच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून स्वतंत्र विद्यापीठ गठीत करावे, अशा आशयाची विनंती उभय मंत्र्यांनी केली आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ विद्यार्थ्यांना हवे असल्यास त्या मागणीचा सकारात्मक विचार करा, तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून जून २०१८ पूर्वी निर्णय करू, असे आश्‍वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच विधान परिषदेत दिले आहे.

Web Title: Ratnagiri News demand of Konkan University