देवरूख नगरपंचायतीसाठी शिवसेनेच्या 16 उमेदवारांची यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

रत्नागिरी - रत्नागिरी पालिका प्रभाग क्र. 3 ची पोटनिवडणूक, देवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. पोटनिवडणुकीसाठी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, तर देवरूख नगराध्यक्षपदासाठी सौ. धनश्री बोरूकर यांच्यासह 17 उमेदवारांची यादी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी प्रसिद्ध केली. 

देवरूख नगरपंचायतीच्या 17 जागांवर शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. सतरा जागांपैकी 16 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. माजी राज्यमंत्री रवींद्र माने, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्या शिफारशीवरून, तर रत्नागिरी प्रभाग क्र. 3 च्या पोटनिवडणुकीसाठी आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्या सूचनेवरून ही नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख विजय कदम यांनी शिफारस होती. त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

पोटनिवडणुकीसाठी राजन रामकृष्ण शेट्ये, तर देवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष म्हणून धनश्री बोरूकर, तर प्रकाश शांताराम मोरे, अक्षता अशोक मुंडेकर, सुवर्णा मंगेश शिंदे, वैभव वंसत पवार, बबन सदाशिव बांडागळे, मानस विकास जागुष्टे, दत्ताराम गणू कांगणे, . अनुष्का समीर टिळेकर, मेघा महेश बेर्डे, जयंत सखाराम चव्हाण, नीलम नितीन हेगशेट्ये, दीक्षा देवेंद्र शेट्ये, प्रमोद काशिराम कदम, संपदा राकेश खवळे, निधा इस्तियाक कापडी आणि प्रभाग 16 साठी विलास शांताराम केदारी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग 17 मधील उमेदवाराचे नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही. 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election