देवरूख नगपंचायत निवडणूकीत वैभवी पर्शराम बिनविरोध

संदेश सप्रे
मंगळवार, 20 मार्च 2018

देवरूख - शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. आजच्या छाननीत तो अर्ज वैध ठरल्याने वैभवी पर्शराम यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून सर्वपक्षीयांनी आज पर्शराम यांचे अभिनंदन केले. 

देवरूख - शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. आजच्या छाननीत तो अर्ज वैध ठरल्याने वैभवी पर्शराम यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून सर्वपक्षीयांनी आज पर्शराम यांचे अभिनंदन केले. 

देवरूखात प्रभागांची रचना जाहिर झाल्यावर पर्शरामवाडी हा शहराच्या एका टोकाला असलेल्या संपूर्ण वाडीचा एक प्रभाग जाहिर झाला. येथे सर्वपक्षीयांची मक्तेदारी आहे मात्र राजकारणामुळे वाडीत वाद नकोत असे म्हणत ग्रामस्थांनी तीन वेळा बैठका घेत बिनविरोध निवडीचा प्रस्ताव समोर ठेवला. यातून सौ. पर्शराम यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांना येथून उमेदवार देऊ नका अशी विनंती केली होती. वाडीच्या या विनंतीला मान देत सर्वपक्षीयांनी येथून उमेदवार न देण्याचा निर्णय घेत वाडकर्‍यांच्या निर्णयाचा आदर केला. यामुळे प्रभाग 17 साठी सौ. पर्शराम यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. आजच्या छाननीत तो वैध ठरल्यानंतर पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. 

यावेळी छाननीकक्षाबाहेर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विवेक शेरे, शहराध्यक्ष हानीफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, बाळू ढवळे, शिवसेनेचे संतोष लाड, बंड्या बोरुकर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, मंदार भिडे, कुंदन कुलकर्णी, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, जयंत राजवाडे, यशवंत गोपाळ मनसेचे अनुराग कोचिरकर, काँग्रेसचे अनिल भुवड, श्रीकांत शेट्ये, कुणबी सेनेचे राजु धामणे आदींनी पुष्पहार देत पर्शराम यांचे अभिनंदन केले. सर्वपक्षीयांनी दिलेल्या साथीमुळेच आपण बिनविरोध निवडुन येऊ शकल्याचे सांगत पर्शराम यांनी सर्वांचे आभार मानले. संध्याकाळी कुणबी सेनेच्या वतीने त्यांचा कार्यालयातही जाहिर सत्कार करण्यात आला. 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election