देवरुखातील पुरुष उमेदवारांचे भवितव्यही महिलांहाती

संदेश सप्रे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत 9864 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे देवरुखातील उमेदवारांच्या विजयाची किल्ली महिलांच्याच हाती राहणार आहे.

देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत 9864 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे देवरुखातील उमेदवारांच्या विजयाची किल्ली महिलांच्याच हाती राहणार आहे.

विशेष म्हणजे महिला मतदारांप्रमाणेच नगरपंचायतीच्या 17 पैकी तब्बल 9 जागा महिलांसाठीच राखीव असून नगराध्यक्षपदही महिलांचेच असल्याने येथे 10 महिला सत्तास्थानावर येणार आहेत. शहरातील 17 प्रभागात 9864 मतदार असून यामध्ये 4887 पुरुष आणि 4977 महिलांचा समावेश आहे. प्रभागनिहाय मतदारांमध्ये प्रभाग 1 मधील 532 मतदारांमध्ये 263 पुरुष व 269 महिला, प्रभाग 2 मध्ये 544 मतदारांमध्ये 274 पुरुष, 270 महिला, प्रभाग 3 मध्ये 623 मतदारांमध्ये 312 पुरुष, 311 महिलांचा समावेश आहे. प्रभाग 4 मध्ये 638 मतदार असून त्यात 321 पुरुष व 317 महिला, प्रभाग 5 मध्ये 632 मतदार असून 309 पुरुष आणि 323 महिलांचा समावेश आहे. प्रभाग 6 मध्ये 595 मतदारांमध्ये 283 पुरुष, 312 महिला, प्रभाग 7 मध्ये 612 मतदारांमध्ये 299 पुरुष 313 महिला, प्रभाग 8 मध्ये 510 मतदारांमध्ये 258 पुरुष, 243 महिला, प्रभाग 9 मध्ये 480 मतदार असून त्यात 234 पुरुष, 246 महिलांचा समावेश आहे.

प्रभाग 10 मध्ये 582 मतदारांमध्ये 280 पुरुष, 302 महिला, प्रभाग 11 मध्ये 256 पुरुष, 248 महिला, प्रभाग 12 मध्ये 719 मतदार असून 338 पुरुष, 381 महिलांचा समावेश आहे. प्रभाग 13 मध्ये 686 मतदार असून 350 पुरुष, 336 महिला, प्रभाग 14 मध्ये 614 मतदार असून 313 पुरुष आणि 301 महिलांचा समावेश आहे. प्रभाग 15 मध्ये 556 मतदार असून 272 पुरुष, 284 महिला, प्रभाग 16 मध्ये 525 मतदारांमध्ये 277 पुरुष, 248 महिला, प्रभाग 17 मध्ये 521 मतदार असून 248 पुरुष व 273 महिलांचा समावेश आहे. 17 प्रभागांमध्ये 17 मतदान केंद्र असून काही ठिकाणी एकाच इमारतीत दोन प्रभागांच्या मतदान केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election