देवरूख उपनगराध्यक्षपदी कोण ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

देवरूख - थेट नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता देवरुखात उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने निवडणुकीत निर्विवाद यश मिळविल्याने संतोष केदारी आणि सुशांत मुळ्ये यांच्या नावाची चर्चा होत आहे.

देवरूख - थेट नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता देवरुखात उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने निवडणुकीत निर्विवाद यश मिळविल्याने संतोष केदारी आणि सुशांत मुळ्ये यांच्या नावाची चर्चा होत आहे.

देवरूखच्या पहिल्या थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मृणाल शेट्ये यांना मिळाला. त्यांच्यासह नगरसेवकपदासाठी भाजपचे ७, तर मनसेचा एक असे युतीचे एकूण ८ नगरसेवक सभागृहात असणार आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी बहुमत आवश्‍यक नसले, तरी मतदानाची वेळ आल्यास ते निर्णायक ठरू शकते. १७ प्रभागीय नगरपंचायतीत १ अपक्ष बिनविरोध निवडून आला आहे. अपक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी हा उमेदवार सत्ताधारी पक्षाला सहकार्य करणार असल्याची चर्चा देवरुखात सुरू आहे. यामुळे भाजपचे बहुमत ९ वर जाणार आहे. उपगनराध्यक्षपदासाठी मतदान झाल्यास सभागृहात भाजपचेच पारडे जड राहणार आहे.

यावेळी निवड झालेल्या नवीन सदस्यांमध्ये शिवसेनेकडे केवळ ४, तर काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आणि सेनेचे जमण्यासारखे नाही, परिणामी येथे वन टू का फोर होण्याची शक्‍यता कमीच आहे. नगराध्यक्षपदी महिला असल्याने आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण पाच वर्षांचा असल्याने उपनगराध्यक्षपदी पुरुषांनाच संधी मिळणार हे उघड आहे. यासाठी भाजपकडून संतोष केदारी आणि सुशांत मुळ्ये यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे.  

केदारी यांनी भाजपकडून सर्वाधिक मते मिळवण्याचा पराक्रम केला आहे. नूतन नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा कार्यकाल २८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर ही निवड होणार असली, तरी त्याची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. भाजपला आरपीआय आणि मनसेने साथ दिली आहे. या दोन्ही पक्षांचे एकेक नगरसेवक सभागृहात आहेत. 

दोन्ही पक्षांना सत्तेत वाटेकरी करायचे असल्याने उपनगराध्यक्षपदाच्या पाच वर्षांचे ४ भाग होण्याचीही शक्‍यता आहे. यातील सुरवातीचा आणि शेवटची टर्म भाजपला, तर मधल्या अडीच वर्षात आरपीआय आणि मनसेला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election