रायगडहून आलेल्या प्रेरणा ज्योतचे कोसुंब येथे स्वागत

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 30 मे 2018

साडवली -  कोकणातील शहिद जवान स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त किल्ले रायगड येथून प्रेरणा ज्योत दौड काढण्यात आली आहे. ही ज्योत संगमेश्वर तालुक्यात आली असता कोसुंब येथे देवरुखमधील संस्था संघटनांनी या ज्योतीचे स्वागत करण्यात आले.

साडवली -  कोकणातील शहिद जवान स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त किल्ले रायगड येथून प्रेरणा ज्योत दौड काढण्यात आली आहे. ही ज्योत संगमेश्वर तालुक्यात आली असता कोसुंब येथे देवरुखमधील संस्था संघटनांनी या ज्योतीचे स्वागत केले.

देवरुख मधील माॅर्निंग क्रिकेट क्लब, राजु काकडे हेल्प अॅकॅडमी, सृष्टी नेचर क्लब यांच्या युवा सदस्यांनी या ज्योतीचे स्वागत केले. सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापु गांधी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीनगर रहिवासी मिञमंडळाचे कार्यकर्ते यांनी ही ज्योत रायगडहून आणली.

कोसुंब ते देवरुख सोळजाई मंदीर या मार्गावर बाईक रॅली काढण्यात आली. शहिदांना अभिवादन करण्यासाठी युवावर्गाने चांगली हजेरी लावली. देशभक्तीची प्रेरणा या स्मारकामुळे वाढीस लागेल असे मत संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्रकल्प प्रमुख मदन मोडक यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Ratnagiri News Devrukh Prerana Jyoti Welcome to Kosamba