सार्वजनिक विहिरीत उडी मारून 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देवरुख (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील २० वर्षीय विवाहितेने सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल (ता. २) रोजी उघडकीस आली. या विवाहितेचे लग्न वर्षापूर्वीच झाले होते. तसेच २४ दिवसांपूर्वी ती प्रसुत झाली होती. चिमुरडे बाळ पदरात असताना तिने केलेल्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

रसिका सतीश पगार (२०/ सासर - पाटगाव -माहेर मुचरी भालेकरवाडी संगमेश्वर) असे या महिलेचे नाव आहे. रसिका हिचा विवाह गतवर्षी पाटगाव मधील सतीश पागार याच्याशी झाला होता. गेले दोन महिने ती प्रसूतीसाठी माहेरी मामाच्या घरात राहायला आली होती. २४ दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. रसिकाचे आई - वडील लहानपणीच वारले होते. त्यांच्या पश्चात तिच्या मामाने तिला मुली प्रमाणे वाढवले होते. ९ ऑक्टोबरला प्रसृत झाल्यावर तिचे बाळ सासरच्या मंडळींनी ठेवून घेतले होते. रसिकाला दुर्धर आजार होता याच नैराष्येतुन तिने आपली जीवनयात्रा संपवल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
काल दुपारपर्यंत रसिका घरी नसल्याने तिचे मामा श्री भालेकर यांनी तिचा शोध घेतला असता ति विहिरीत तरंगताना आढळली. त्यांनी गावचे पोलिस पाटील विकास महाडिक याना खबर दिली. महाडिक यांनी संगमेश्वर पोलिसांना पाचारण केले. विहीर उंच असल्याने राजु काकडे हेल्प कार्यकर्त्यांच्या मदतीने तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान २४ दिवसांचे गोंडस बाळ पदरात असतानाही रसिकाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com