थिबा राजवाडा पर्यटकांना बंदच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

रत्नागिरी - मे महिन्याच्या सुटीसाठी हजारो पर्यटक थिबा राजवाडा पाहण्यासाठी रत्नागिरीत येतात; मात्र एका जिन्याची दुरुस्ती रखडल्यामुळे हा ऐतिहासिक राजवाडा त्यांना पाहता येत नाही. निधीअभावी काम रखडल्याचे पुरातत्त्‍व विभागाकडून सांगितले जाते. तळमजल्यावरील म्युझियममधील काही जुन्या वस्तू तेवढ्याच पाहता येतात. गेल्या चार वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही कामे अपूर्ण राहिली आहेत.

थिबा राजवाडा हे देशविदेशातील पर्यटक, अभ्यासकांचे आकर्षण आहे. ऐन मोसमात दुरुस्तीमुळे तो बंद ठेवला आहे. दुरुस्तीसाठी आवश्‍यक निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. तीन वर्षांनंतर त्याला मान्यता मिळाली २ कोटी १७ लाख १२ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून त्यापैकी १ कोटी ४८ लाख ८८ हजार रुपये खर्च झाले. उर्वरित ६० लाख २४ हजार रुपये पॉलिशच्या कामासाठी खर्च केले जाणार आहेत. यापूर्वी पोर्चसह आतील छप्पर, दरवाजे, लादी, खिडक्‍यांचे काम केले आहे. छताची दुरुस्ती करताना पोर्तुगाल आणि स्पेनमधून कौले आयात केली. आतील चार जिन्यांची दुरुस्ती बाकी आहे. जिने धोकादायक असल्याने पर्यटकांना राजवाड्यात पाठविता येत नाही.

कोटथिबा राजावरचे पुस्तक वाचून रत्नागिरी आलो. तेव्हा त्याचा राजवाडा पाहण्याची आत्यंतिक इच्छा होती. ऐतिहासिक साधने आणि वास्तूंबाबत आपल्या समाजाची अनास्था येथे पाहायला मिळाल्याने निराशा झाली. थिबा राजवाडा पाहता आला नाही. त्याऐवजी अनास्था पुढे आली.
- वैभव पाटणकर
, पर्यटक

सहा वर्षांनंतर पुन्हा तेच काम
२००८-०९ मध्ये ७० लाख रुपये खर्च करून राजवाड्याच्या काही भागात लादीचे, लाकडी काम करण्यात आले. पाच ते सहा वर्षे झाल्यानंतर तेच काम पुन्हा हाती घेण्यात आले.

Web Title: Ratnagiri News Diba Palace issue