रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १,३२५ शाळांत डिजिटल शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचे ध्येय घेऊन शिक्षण विभाग गेले दोन वर्षे काम करीत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यातील २,७१९ पैकी १,३२५ शाळा डिजिटल करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. संगणक, लॅपटॉप किंवा टॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण पद्धती राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचे ध्येय घेऊन शिक्षण विभाग गेले दोन वर्षे काम करीत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यातील २,७१९ पैकी १,३२५ शाळा डिजिटल करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. संगणक, लॅपटॉप किंवा टॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण पद्धती राबविण्यात येत आहे.

आधुनिक पद्धतींचा नियमित शिकवणीत वापर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये त्याला चांगला जोर आला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकसभागातून निधी संकलनाचा अवलंब केला जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पूर्वी इमारतीपासून ते अगदी संगणकापर्यंतच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध होत होता; परंतु आता त्यात कपात झाली आहे.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार चित्रफीत किंवा संभाषणातून विद्यार्थी लवकरात लवकर शिक्षण आत्मसात करतात. त्याच धर्तीवर एलसीडी प्रोजेक्‍टर, संगणकातील शैक्षणिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून अभ्यास शिकवण्याचा फंडा सगळीकडेच वापरला जात आहे. इंग्रजी शाळांमध्ये त्याचा वापर नियमित होत आहे. त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो.

दऱ्याखोऱ्यात वसलेल्या प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यासाठी शैक्षणिक उठाव ही संकल्पना शिक्षकांकडून राबवित आहेत. दहा हजारपासून लाखो रुपयांपर्यंतची रक्‍कम शाळांना देणगी स्वरूपात मिळत आहे. त्यातून शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्‍यक साहित्य घेतले जात आहे. 

तेराशेहून अधिक शाळांमधील प्रत्येकी एक वर्ग डिजिटल करण्यात आला आहे. सर्व शाळा डिजिटल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून केंद्रस्तरावर सूचना पाठविण्यात आल्या आहेत.
- दीपक नागले
, सभापती, शिक्षण

Web Title: Ratnagiri News Digital education in 1325 ZP Schools