दिनेश शिगवणचा खून प्रकरणः दुसरी पत्नी आणि मित्राने काढला काटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

दाभोळ - माळवी येथील दिनेश शिगवणचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा खून मित्र संतोष निर्मळ व त्याची दुसरी पत्नी संगीता शिगवण यांनी केला. तशी कबुली संतोष निर्मळने दिल्याचे दापोली पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कॉल रेकॉर्डवरून या दोघांना गजाआड केले आहे.

दाभोळ - माळवी येथील दिनेश शिगवणचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा खून मित्र संतोष निर्मळ व त्याची दुसरी पत्नी संगीता शिगवण यांनी केला. तशी कबुली संतोष निर्मळने दिल्याचे दापोली पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कॉल रेकॉर्डवरून या दोघांना गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  दिनेश सकाळी गुरे सोडण्यासाठी १६ मार्चला माळवी डोंगरात गेला होता. तेथे अगोदरच पोचलेल्या संतोषने मंडपासाठी चांगले वासे मिळतील, असे सांगून काही झाडे दाखविली. दिनेश ती असताना संतोषने दांडका त्‍याच्या डोक्‍यात मारला. तो खाली पडला व तडफडू लागला. संतोषने मानेवर पाय देऊन त्याला ठार मारले. 

मृतदेह गोणात भरून खांद्यावरून नेला

दिनेश मेल्याचे लक्षात आल्यावर तेथेच एका झाडाखाली त्याला टाकून त्याच्यावर पालापाचोळा टाकून तेथेच ठेवण्यात आले व दोन दिवसांनी दोन गोण आणून त्यात दिनेशचा मृतदेह भरला. तो मृतदेह खांद्यावर घेऊन तो कोंडीच्या पऱ्ह्यात एका खाचेत टाकून दिला. त्याच्यावर पालापाचोळा टाकून दिला. 

संतोष हा दिनेशचा मृतदेह शोधण्यासाठी गावकऱ्यांसोबतही होता. तसेच दिनेशचा मारेकरी शोधण्यासाठीही तो पोलिसांना मदत करत होता. दिनेशची दुसरी बायको संगीता व संतोष यांचे अनैतिक संबध असल्याचे दिनेशला समजले होते व त्यावरूनच दिनेशचे व संगीताचे १५ मार्चला मोठे भांडणही झाले होते. संगीताशी असलेल्या प्रेमसंबंधात दिनेशचा अडसर होत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट संतोषने आखला व तो पूर्ण केला. दापोली पोलिसांनी केवळ तीन दिवसांत संशयितांपर्यंत पोचून या गुन्ह्याचा तपास लावला. 

यांनी केला तपास
तपास पथकात दापोलीचे पोलिस निरीक्षक अनिल लाड, आडे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बांगर, शांताराम रहाटे, शिवराज दिवाळे व सागर 
कांबळे होते. 

असा केला तपास
दापोली पोलिसांना तपास करताना दिनेश व संगीता यांचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागली होती. त्यानंतर पोलिसांनी संगीताचा मोबाईल ताब्यात घेतला व कॉल रेकॉर्ड पाहिले. त्यानंतर संगीता व दिनेश यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून तुमच्यात कोणत्या गोष्टीवरून बोलणे झाले, याची विचारणा केली असता दोघांच्या बोलण्यात तफावत आढळली. त्यावर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. दिनेशला पोलिसी खाक्‍या दाखविताच हा खून आपणच केला असल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली.

Web Title: Ratnagiri News Dinesh Shivgan Murder case