मधुमेहावरील औषधात बीजकची सालही परिणामकारक - डॉ. मंदार तिरमारे

राजेंद्र बाईत
बुधवार, 13 जून 2018

राजापूर - मधुमेहावरील आयुर्वेदिक औषधांसाठी वापरण्यात येणार्‍या बिजकच्या खोडाच्या गाभ्यातील आणि सालीत घटकांमध्ये साम्य आढळले आहे. त्यामुळे या आजारांवरील औषधामध्ये बीजकच्या खोडासह सालीचा उपयोग होणार आहे. ‘बीजक’ वनस्पतीच्या ‘कृमिघ्न कर्मा’विषयी लांज्यातील डॉ. मंदार मनोहर तिरमारे यांनी यशस्वी संशोधन केले. त्याआधारे त्यांनी हा दावा केला आहे. 

या संशोधनाची दखल अर्काशाईन हेल्थ सायन्सेस या संस्थेने घेतली. थायलंड येथील आंतराराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेमध्ये डॉ. तिरमारे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. आनंद ओक, डॉ. दिलखुश तांबोळी, डॉ. वहिदा तांबोळी यांच्यासह आयुर्वेद तज्ज्ञ चिकित्सक उपस्थित होते.

बेसुमार तोडीमुळे ही वनस्पती दुर्मिळ होत आहे. याचे लाकूड पाण्यात ठेवल्यास प्रथम पिवळे व नंतर निळसर होते. मध्य आणि दक्षिण भारतासह बिहार, ओरिसामधील डोंगराळ भागात आढळते. याच्या दोन कठीण बिया असतात. त्या लहान आणि कमी असल्याने त्याला बीजक म्हणतात. पावसाळ्याच्या प्रारंभी झाडाला फुले, तर पौष-माघात फळे येतात.  

  • कुळ - शिम्बीकुल, उपकुलः अपराजिता
  • स्वरूप - सुमारे तीस मीटर उंचीचे व तीन मीटर रुंदीचा वृक्ष
  • त्वचा - धुरकट. जुन्या वृक्षावर तांबडा डिंक जमतो.
  • पर्ण - विषमदल पाच ते सात पर्णदले
  • गुण - रस ः कषाय, वीपाक ः कटु, वीर्य ः शीत
  • कर्म व उपयोग - कषपित्तशामक

मधुमेहावर बीजकच्या खोडातील गाभ्याचा उपयोग होतो. त्यासाठी झाड तोडावे लागते. गाभा आणि सालीमध्ये सारखेच घटक आढळले. त्यामुळे खोडाऐवजी सालीचाही उपयोग करणे शक्य आहे. यामुळे झाडाची तोड थांबेल.

- डॉ. मंदार तिरमारे 

Web Title: Ratnagiri News Dr Mandar Tirmare research