अक्षय्यतृतीयेपासून गुहागरात सांस्कृतिक कट्टा - डॉ. विनय नातू

मयुरेश पाटणकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

गुहागर - पर्यटकांनी सायंकाळी समुद्रावर जावे. सुर्यास्तानंतर समुद्रकिनार्‍यावरील खुल्या रंगमंचावर लोककला पहावी. रात्रीचे भोजन आणि निवास गुहागरात करावे. या संकल्पनेतून सांस्कृतिक कट्टाचा जन्म झाला आहे. अक्षयतृतीयेपासून याची सुरवात होत आहे असे डाॅ. विनय नातू यांनी सांगितले. 

गुहागर - पर्यटकांनी सायंकाळी समुद्रावर जावे. सुर्यास्तानंतर समुद्रकिनार्‍यावरील खुल्या रंगमंचावर लोककला पहावी. रात्रीचे भोजन आणि निवास गुहागरात करावे. या संकल्पनेतून सांस्कृतिक कट्टाचा जन्म झाला आहे. अक्षयतृतीयेपासून याची सुरवात होत आहे असे डाॅ. विनय नातू यांनी सांगितले.  पर्यटनवृद्धीतून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मिती हे मुद्दे पुढे नेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.  

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने पर्यटनवृध्दी आणि रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. त्याचीच सुरवात निवडणुकीनंतर डॉ. नातूंनी सुरू केली आहे. त्यासाठी एकदंत एंटरटेन्मेंट या संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. पत्रकार विनोद घाडे, संतोष घुमे, नगरसेवक गजानन वेल्हाळ या संस्थेचे संचालक आहे. व्यवस्थापक म्हणून नीलेश गोयथळे काम पहाणार आहे. या संस्थेतर्फे गुहागरला अक्षय्यतृतीयेपासून सांस्कृतिक कट्टा सुरू होणार आहे. 

मला गुहागरमध्ये येऊन पैसा कमवायचा नाही. मात्र कोणते पर्याय यशस्वी होतील हे दाखवून देण्यासाठी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचा व्यवसाय यशस्वी केला. त्यातून रोजगार निर्मिती होते हे दाखवून दिले. सांस्कृतिक कट्टा हा देखील यापैकीच एक प्रयोग आहे. दिशा दाखविल्यावर स्थानिकांनी यामध्ये लक्ष घालून नवनवीन व्यवसाय सुरू केले पाहिजेत. अन्यथा परगावातील, परराज्यांतील लोकांनी असे व्यवसाय सुरू केल्यावर विरोधात ओरड करणे चुकीचे ठरेल

-  डॉ. विनय नातू

डॉ. नातू म्हणाले की, सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. गुहागर विजापूर या महामार्गाचे तीनपदरी रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. या दोन्ही मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर गुहागरमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढेल.  गुहागर सर्वात मोठे पर्यटन केंद्र बनेल.

पर्यटकांना थांबविण्यासाठी मनोरंजनाचे विविध पर्याय गुहागर तालुक्यात उभे राहीली पाहिजेत. म्हणून एकदंत एन्टरटेन्मेंट संस्थेतर्फे गुहागरच्या समुद्रावर सांस्कृतिक कट्टा निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या ठिकाणी कोकणातील कला, संस्कृती व परंपरचे दर्शन घडविणारे शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, सण, उत्सव, जाखडी, नमन आदी कार्यक्रमांचा होतील. उन्हाळ्याच्या सुट्टीत सलग 45 दिवस हा कार्यक्रम होईल. कलाकारांना मानधन देता यावे व आयोजनाचा खर्च निघण्यासाठी प्रति व्यक्ति 220 रुपये आकारण्यात येणार आहेत, असेही डाॅ. नातू यांनी सांगितले. 

Web Title: Ratnagiri News Dr Vinay Natu Press