रेल्वेतून पडून इंजिनिअरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

लांजा - रेल्वेतून गोव्याहून मुंबईला जात असताना विलवडे स्थानकाजवळील वाघणगाव बोगद्याशेजारी ४२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा तोल जाऊन जागीच मृत्यू झाला.

लांजा - रेल्वेतून गोव्याहून मुंबईला जात असताना विलवडे स्थानकाजवळील वाघणगाव बोगद्याशेजारी ४२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा तोल जाऊन जागीच मृत्यू झाला. लांजा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. २५ मे रोजी रात्री एक वाजता अपघात झाला. कोणत्या रेल्वेतून तो पडला हे समजू शकलेले नाही.

मंगेश सीताराम चव्हाण (वय ४२, रा. निर्व्हाळ, ता. चिपळूण) हे २५ मे रोजी गोव्यात मित्राकडे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून रात्री गोव्याहून रेल्वेतून मुंबईकडे निघाले होते. रेल्वे विलवडे स्थानकानजीक वाघणगाव बोगद्याजवळ आली असता दरवाजाजवळ उभ्याने प्रवास करणाऱ्या मंगेश चव्हाण यांचा झोपेत तोल गेला व ते बाहेर पडले.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. लाईनमन आनंद दत्ताराम जाधव यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांना पाहिले. त्यांनी या अपघाताची खबर विलवडे स्थानकात दिली. विलवडे स्टेशनप्रमुखांनी याबाबतची खबर लांजा पोलिसांना दिली. पोलिसांकडून पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. 

दरम्यान, अंदाजे रात्री १ वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडल्याचे समजते. सध्या जादा रेल्वे सोडल्या असल्याने या वेळी येथून अनेक रेल्वे मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या रेल्वेने मंगेश चव्हाण प्रवास करीत होते व त्यांचा अपघात झाला हे समजू शकलेले नाही.

Web Title: Ratnagiri News Engineer death due to falling from the train