पर्यावरण दिनानिमित्त पांढरा समुद्र येथे स्वच्छता मोहिम

राजेश शेळके
मंगळवार, 5 जून 2018

रत्नागिरी - केंद्रीय पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, समाजिक वनीकरण यांनी जागतिक पर्यावरण दिनामित्त आज सागरी किनारा स्वच्छता व प्लास्टिक कचर्‍याच्या निर्मुलानासाठी पांढरा समुद्र येथे स्वच्छता मोहिम राबविली. सकाळ मिडिया हे माध्यम प्रायोजक होते. विविध कंपन्यांनी, आयटीआयचे मुलांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छता मोहिम यशस्वी केली. सुमारे दीड ते दोन टन कचरा गोळा केला. 

केंद्र शासनाने निवडलेल्या किनार्‍यांमध्ये गणपतीपुळे आणि मिर्‍या किनार्‍याचा समावेश होता. समाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून पंधरा मे पासून ही स्वच्छता मोहिम सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थी, निसर्ग प्रेमी, विविध कंपन्या, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या.  

महाविद्यलये, सामाजिक संस्था आदी त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज पांढरा समुद्र किनार्‍यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, फिनोक्स कंपनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणंडळाच्या अधिकारी सौ. गायकवाड, फिशरीज कॉलेजचे डॉ. पागारकर, प्रोफेसर श्री. चोगले, वन विभागाच्या श्रीमती लगड, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण चंद्रशेखर धुमाळ, सहाय्यक वन संरक्षक ए. ए.लाड, सकाळचे कर्मचारी राजू चव्हाण, राजेश शेळके, श्री. मजगावकर, राजेश कळंबटे आदी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात समुद्र किनार्‍यावर साचलेले प्लास्टिक, बाटल्या, कचरा, थर्माकॅल, ओला कचरा आदी गोळा करून किनारा स्वच्छ केला.  

त्यानंतर मिर्‍या ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक आणि सरपंच आरती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. 

Web Title: Ratnagiri News Environment Day Event