सतराशे हेक्‍टरवरील हापूस जाणार सातासमुद्रापार

राजेश कळंबटे
गुरुवार, 15 मार्च 2018

रत्नागिरी - हापूसची चव सातासमुद्रापार पोचविण्यासाठी ‘मॅंगोनेट’ प्रणालीचा आधार पणन, कृषी विभागाने घेतला. त्याला गेली दोन वर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील २,११६ बागायतदारांनी परदेशी निर्यातीसाठी नोंदणी केली असून १,७४८ हेक्‍टरवरील आंबा निर्यातीसाठी सज्ज आहे. मॅंगोनेटवर ८२ निर्यातदारांनीही नोंदणी केली आहे.

रत्नागिरी - हापूसची चव सातासमुद्रापार पोचविण्यासाठी ‘मॅंगोनेट’ प्रणालीचा आधार पणन, कृषी विभागाने घेतला. त्याला गेली दोन वर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील २,११६ बागायतदारांनी परदेशी निर्यातीसाठी नोंदणी केली असून १,७४८ हेक्‍टरवरील आंबा निर्यातीसाठी सज्ज आहे. मॅंगोनेटवर ८२ निर्यातदारांनीही नोंदणी केली आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे हापूसच्या निर्यातवारीत अडचणी निर्माण झाल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पणन, कृषी विभागाने निकष निश्‍चित केले. त्यासाठी मॅंगोनेट प्रणाली विकसित केली.

एक लाख टनाचे उद्दिष्ट
देशामध्ये उत्पादित विविध जातींचे आंबे निर्यात केले जातात. गेल्या वर्षी ५३ हजार टन आंबा भारतातून विविध देशांमध्ये निर्यात करण्यात आला. यावर्षी एक लाख टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट पणन मंडळाने ठेवले आहे. त्यासाठी मॅंगोनेट प्रणालीचा उपयोग होत असून निर्यातदार थेट बागायतदारांशी संपर्क 
करीत आहेत.
 

पणनच्या वेबसाईटवर निर्यातक्षम बागायतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बागांचे क्षेत्र निश्‍चित झाल्यावर निर्यातीसाठी घ्यावयाची काळजी याचे महत्त्व पटवून देण्यात आले. गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मॅंगोनेटवर रत्नागिरी जिल्ह्यातील २,११६ बागायतदारांनी हापूस निर्यातीची तयारी दर्शविली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३३ बागायतदारांनी नोंदणी केली आहे. २८ फेब्रुवारी ही अखेरीची तारीख होती. गतवर्षीपर्यंत १७१७ हेक्‍टरची नोंद होती. यावर्षी त्यात ३० हेक्‍टरची भर पडली. ऑनलाइन नोंदणी केलेल्या बागायतदारांना त्यांचे सर्टिफिकेट दिलेले आहे. ते सादर केल्याशिवाय आंबा निर्यात केला जात नाही. मॅंगोनेट सर्टिफिकेट हापूसच्या दर्जाची ओळख आहे. त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

निर्यातीसाठी हापूसची प्रत कशी असावी, याची माहिती मॅंगोनेटवरील नोंदणीनंतर मिळाली. निर्यातदार थेट संपर्क करू लागल्यामुळे दरही मिळू लागला आहे.
- प्रसन्न पेठे,
बागायतदार

मॅंगोनेटवरील दरवर्षी नोंदणी करून घेतली जाते. मागील वर्षी नोंदणी केलेल्यांचे प्रमाणपत्र नूतनीकरण केले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात बागायतदारांचा चांगला प्रतिसाद आहे.
- तरुण वैती,
प्रभारी कृषी उपसंचालक

मॅंगोनेटवर बागायतदारांसह निर्यातदार, परदेशांतील दर, तेथील विक्रेते यांचीही माहिती अपलोड करण्यात आली आहे. निर्यातदारांमध्ये ८२ जणांची नावे नोंद आहेत. कुवेत, रशिया, इंग्लंड, स्वीडन, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिआ, जपान, कॅनडा, मॉरिशस, न्यूझीलंड, दुबई आणि आखाती देशांमध्ये हापूस पाठविला जातो. यांतील काही देशांना पाठविण्यात येणाऱ्या फळांवर प्रक्रिया करावी लागते. त्याचे निकष, फळांचे वजन निश्‍तिच केले आहे. त्याचा दर्जाही राखावा लागतो. सेंद्रिय फळाला परदेशांत मागणी असल्याने मॅंगोनेट प्रणाली बागायतदारांसाठी वरदान ठरली आहे. गेल्यावर्षी वाशीमधून शेकडो टन हापूस निर्यात करण्यात आला. निर्यातदार थेट बागायतदारांच्या शेतात जाऊन आंबा विकत घेत आहेत. त्यामुळे जागेवर दर चांगला मिळत आहे.
 

Web Title: Ratnagiri News export of Mango through Mango net