लांजा तालुक्यात खानवली येथे वणव्यात आंबा बाग खाक..

अमोल कलये
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या वणव्यांचे सत्र सुरुच आहे. रविवारी मंडणगड तालुक्यात एका घरासह दोन गोठे वणवण्यात जळून खाक झाले होते. ही घटना ताजी असताना आज लांजा तालुक्यातील खानवली गावात वणवा पेटला. 

रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या वणव्यांचे सत्र सुरुच आहे. रविवारी मंडणगड तालुक्यात एका घरासह दोन गोठे वणवण्यात जळून खाक झाले होते. ही घटना ताजी असताना आज लांजा तालुक्यातील खानवली गावात वणवा पेटला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की खानवली गावात लागलेल्या मोठ्या वणव्यात आंब्याची ४५० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जवळपास १६ एकर वरील कलमे यात जळून खाक झाली आहेत. दुदैवाची गौष्ट म्हणजे येत्या दोन दिवसात या आंब्याची तोड होणार होती. मात्र हे सर्व आंबा पिक जळून खाक झाले आहे. पेटलेला वणवा आोटक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. विशेष म्हणजे ज्यांची कलमाची बाग जळाली आहे ते सध्या परगावी आहेत. त्यांच्या बागेत असलेल्या नोकराने वणवा आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. डोळ्यासमोर आंब्याची कलमे जळून खाक झाल्याने त्याच्या ही डोळ्यात अश्रू तरळत होते.

Web Title: Ratnagiri News fire incidence in Khanavali

टॅग्स